Virat Kohli Avneet Kaur News saam tv
Sports

Virat Kohli: माझा कोणताही हेतू नव्हता! अभिनेत्रीचा फोटो लाईक करण्यावर विराटचं स्पष्टीकरण

Virat Kohli Avneet Kaur News: विराट कोहली सोशल मीडियावर फारसा एक्टिव्ह नसतो. सध्या आयपीएलमध्येही विराट चांगली कामगिरी करतो. मात्र एका फोटोला लाईक केल्याने विराटला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू खूप चांगली कामगिरी करतायत. यासोबतच टीमचा स्टार खेळाडू विराट कोहली चांगली फलंदाजी देखील करतोय. यंदाच्या स्पर्धेत विराट कोहली ऑरेंज कॅपचा दावेदार देखील मानला जातोय. मात्र आयपीएल सुरु असताना एक अशी घटना घडलीये की, विराटला त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

भारतीय स्टार खेळाडू विराट कोहलीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिलीये. ही नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया.

कोहलीने काय दिलं स्पष्टीकरण

२ मे रोजी विराटने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात केली. ज्यामध्ये लिहिलंय की, मला हे स्पष्ट करायचं आहे की, माझं फीड क्लियर होत असताना अल्गोरिदमने चुकून कोणतं इंटरएक्शन रजिस्टक केलं आहे. यामागे माझा कोणताही हेतू नव्हता. मी विनंती करतो की याबाबत कोणतेही अनावश्यक संदर्भ बांधू नये.

अवनीत कौरसोबत काय आहे कनेक्शन?

नुकतंच विराट कोहलीच्या एका कृत्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. ३० एप्रिल रोजी अभिनेत्री ३अवनीत कौरने इंस्टाग्रामवर अनेक बोल्ड फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि प्रिंटेड रॅप स्कर्ट घातला आहे. दरम्यान विराट कोहलीने अवनीत कौर नावाच्या फॅन पेजवर पोस्ट केलेला फोटो लाईक केला आणि नंतर तो डिसलाईकही केला.

कोहलीच्या या कृतीने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. १ मे रोजी घडलेल्या या घटनेमुळे युझर्सने त्याला ट्रोलही केलं आहे. कारण या दिवशी त्याची पत्नी अनुष्का शर्माचाही वाढदिवस होता. याच मुद्द्यावरून आता विराटने स्पष्टीकरण दिलंय.

अनुष्का शर्माला दिल्या शुभेच्छा

१ मे रोजी विराटने इंस्टाग्रामवर अनुष्का शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याने एक पोस्ट शेअर केली. त्याने दोघांचा एक प्रेमळ फोटो शेअर केला आणि कॅप्शन दिलं, 'माझी सर्वात चांगली मैत्रिण, माझी जीवनसाथी, माझी सेफ प्लेस, माझी अर्धांगिनी, माझं सर्वकाही.' मी तुझ्यावर दिवसेंदिवस अधिकाधिक प्रेम करतो. माझ्या प्रिय अनुष्का शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT