Suryakumar yadav saam tv
क्रीडा

Suryakumar Yadav : टीममध्ये सेल्फीश खेळाडू...; टी-२० सिरीज जिंकल्यानंतर काय म्हणाला सूर्या?

Surabhi Jagdish

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये तिसरा टी-२० सामना रंगला होता. या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने १३३ रन्सने बांगलादेशाचा पराभव केला. या विजयानंतर भारताने बांगलादेशाला क्लिन स्विप दिला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अजून एक टी-२० सिरीज जिंकली.

या टी-२० सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून पहिल्यांना फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी ६ विकेट्स गमावून 297 रन्स केले. मुख्य म्हणजे ही या फॉर्मेटमधील सर्वोत्तम धावसंख्या होती. या लक्ष्याचा पाठलाग करणं बांगलादेशाच्या टीमला जमलं आणि आणि बांगलादेश केवळ 164 रॅन्सपर्यंत मजल मारू शकली. टीम इंडियाच्या 3-0 ने सिरीज जिंकल्यानंतर टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव खूश दिसून आला.

सिरीज जिंकल्यानंतर काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

तीन सामन्यांची टी-२० सिरीज जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, 'एक टीम म्हणून आम्ही खूप काही साध्य केलं आहे. मला माझ्या टीममध्ये सेल्फीश खेळाडूंना करायचा नाही. आम्हाला निस्वार्थी टीम तयार करायची आहे. हार्दिकने म्हटल्याप्रमाणे, मैदानावर आणि मैदानाबाहेर एकमेकांच्या कामगिरीचा आनंद घेण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे.

गंभीरबाबत काय म्हणाला सूर्या?

सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, 'गौतम भाईने सिरीजच्या सुरुवातीला आणि आम्ही श्रीलंकेला गेल्यावरही असंच सांगितलं होतं की, टीमपेक्षा कोणीही मोठा नाही. तुम्ही 99 किंवा 49 किंवा कोणत्याही स्कोअरवर असाल, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला टीमसाठी मोठा शॉट खेळावा लागेल तर तुम्हाला तो मारावा लागेल. या सामन्यामध्ये संजू सॅमसनने तेच केलं.

प्रत्येकाला त्याचं योगदान द्यावं लागणार

सूर्यकुमार यादवने म्हटलं की, आगामी सामन्यांमध्ये प्रत्येकाला योगदान द्यावं लागेल. या सिरीदमध्ये खेळाडूंनी ज्या पद्धतीने खेळ केला तो वाखाणण्याजोगा होता. यासाठी केवळ चांगल्या सवयी जपा, त्या मैदानावरही कायम ठेवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडमंडळाची उद्या बैठक

Diwali Vacation: दिवाळीची मोठी सुट्टी 'अशी' करा प्लान, 'हे' आहे बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन

Baba Siddique Death : मिरचीचा स्प्रे मारून करणार होते गोळीबार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलिसांनी काय सांगितलं?

Marriage: आत्या-मामा ऐकलं का! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्नासाठी फक्त १८ च आहेत शुभ मुहूर्त; कधी सुरू होणार लग्नसराईचा धूमधडाका

Assembly Election: महायुतीत वाद? आमचं काम रोजचं त्यांचं काम निवडणुकांपुरत, आमदार सुहास कांदेंवर छगन भुजबळांची टीका

SCROLL FOR NEXT