Rohit Sharma  saam tv
Sports

WTC Final 2023 Weather Report: WTC च्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास कोण होणार वर्ल्ड चॅम्पियन?

WTC Final 2023: या सामन्यात जर पाऊस पडला किंवा सामना रद्द झाला. तर कोण होईल विजेता? समजून घ्या कसं असेल समीकरण.

Ankush Dhavre

IND VS AUS,WTC Final 2023: आयपीएल २०२३ स्पर्धा नुकताच संपन्न झाली आहे. अंतिम सामन्यात गुजरातला लोळवत चेन्नईने जेतेपद मिळवलं आहे. आता सर्वत्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

बलाढ्य भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. हा सामना ७ ते ११ जून दरम्यान लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे.

दरम्यान या सामन्यात जर पाऊस पडला किंवा सामना रद्द झाला. तर कोण होईल विजेता? समजून घ्या कसं असेल समीकरण.

या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान पाऊस पडू शकतो. हा सामना ७ ते ११ जून या कालावधीत पार पडणार आहे. या अंदाजानुसार सुरुवातीचे ३ दिवस म्हणजे ७,८,९ ला साधारण पाऊस पडू शकतो. तर १० आणि ११ ला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे नक्कीच क्रिकेट चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

निकाल कसा लावणार?

जर या सामन्यात पावसामुळे निकाल लागू शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात येईल. पावसाचा अंदाज असल्याने खबरदारी म्हणून १२ जून हा रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे.

मात्र सामना जर ड्रॉ झाला किंवा टाय झाला तर दोन्ही संघ विजेते ठरतील. तसेच विजेत्या संघाला मिळणारी रक्कम ही दोन्ही संघांमध्ये समान विभागली जाईल. ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला तब्बल १३ कोटी रुपये तर उपविजयी संघाला ६.५ कोटी रुपये मिळणार आहेत. (Latest sports updates)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, अॅलेक्स कॅऱी (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेज़लवुड, ट्रेविस हेड, जॉश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख़्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, टॉड मर्फ़ी, स्टीवन स्मिथ (उपकर्णधार) मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

राखीव खेळाडू: मिचेल मार्श, मॅट रेनशॉ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT