virat kohli twitter
Sports

Virat Kohli: मित्राच्या मुलाने विचारला विराटला तो प्रश्न, जो प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे; कोहलीने उत्तरही दिलं - VIDEO

Virat Kohli Viral Video: भारतीय संघातील दिग्गज खेळाडू विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळण्याासाठी दिल्लीत पोहोचला आहे. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली तब्बल एक दशकानंतर रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. एरवी मुंबईत राहणारा विराट सध्या दिल्लीत संघासोबत सराव करतोय. रणजी सामन्यासाठी सराव करत असताना जुन्या मित्राने विराटची भेट घेतली. जुन्या मित्राला भेटताच विराटने मिठी मारली.

ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यानंतर मित्राच्या मुलालाही विराटला भेटण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्या मुलाने विराटला एक प्रश्न विचारला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

विराट कोहलीने काय विचारलं?

शावेज खान हा विराट कोहलीचा जुना मित्र आहे. दिल्लीत खेळण्यासाठी आलेल्या विराटला भेटण्यासाठी शावेज खानने मैदानावर हजेरी लावली होती. त्याच्यासोबत त्याचा ८ वर्षांचा मुलगा देखील होता. त्या मुलाला विराटसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. त्याने विराटला विचारलं, भारतीय संघासाठी खेळण्यासाठी काय कराव लागतं? विराटनेही या प्रश्नाचं उत्तर दिलं.

विराटने त्या ८ वर्षाच्या मुलाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटपटून बनण्यासाठी ३ सूत्री फॉर्म्यूला सांगितला. पहिला फॉर्म्युला म्हणजे, मेहनत. मेहनतीला तोड नाही. तुम्ही जितकी मेहनत कराल, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल.

दुसरा फॉर्म्युला म्हणजे, सराव. तुम्हाला सराव करण्यासाठी कोणी सांगायची गरज पडायला नको. इतर लोकं १ तास सराव करत असेल. तर तुम्ही २ तास सराव करायला हवा. तिसरा फॉर्म्युला म्हणजे, एक टार्गेट सेट करा आणि त्याहून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. इतर लोकं ५० मारत असतील, तर तुम्ही १०० धावा करा. इतर लोकं १०० मारत असतील, तर तुम्ही २०० धावा करा. मग भारतीय संघासाठी खेळणं सोपं होऊन जाईल.

विराट कोहली रणजी खेळणार

विराट कोहली हा भारतीय संघातील स्टार खेळाडू आहे. पण गेल्या काही मालिकांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याने रणजी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विराट २०१२ नंतर पहिल्यांदाच दिल्लीसाठी रणजी क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT