viral cricket video twitter
Sports

Viral Cricket Video: फलंदाजाने षटकार मारलेला चेंडू जाऊन पडला स्टेडियमबाहेर; मग बाहेर जे घडलं, एकदा पाहाच

Viral Cricket Video: दक्षिण आफ्रिका टी-२० लीग स्पर्धेत फलंदाजाने चेंडू मारल्यानंतर, तो चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊन पडला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

दक्षिण आफ्रिकेत टी-२० लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत जगभरातील स्टार खेळाडू खेळताना दिसून येत आहेत. या लीग स्पर्धेत फलंदाज धावांचा पाऊस पाडताना दिसून येत आहेत. तर गोलंदाजांजी चांगलीच धुलाई होत आहे.

असाच काहीसा नजारा जोबर्ग सुपर किंग्ज आणि डरबन सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. या सामन्यात एका फलंदाजाने इतका लांब षटकार मारला की चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर जोबर्ग सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फळंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, जोबर्र किंग्ज संघाला २० षटकअखेर ७ गडी बाद १६९ धावा करता आल्या.

या संघाकडून फलंदाजी करताना, लेउस डु प्लूयने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली. तर गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून डरबन सुपर जायंट्स संघाकडून ख्रिस वोक्स, केशव महाराज आणि सुब्रायेनने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

क्लासेनचा खतरनाक षटकार

सुपर किंग्जने उभारलेल्या १६९ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सुपरजायंट्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. अवघ्या २५ धावांवर संघाची सलामी जोडी माघारी परतली. एका बाजूने क्विंटन डीकॉक किल्ला लढवत होता. तर दुसरीकडे विकेट्स जात होत्या. १० व्या षटकात डीकॉकला साथ देण्यासाठी हेनरिक क्लासेन फलंदाजीला आला.

हेनरिक क्लासेनने फलंदाजीत डाव सावरला. सुपर किंग्जकडून १० वे षटक टाकण्यासाठी तबरेज शम्सी गोलंदाजीला आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर क्लासेनने क्लासिक शॉट मारला.

त्याने मारलेला षटकार इतका लांब होता की, चेंडू स्टेडियमच्या छतावर पडून,मैदानाबाहेर जाऊन पडला. हा चेंडू मैदानाबाहेर अललेल्या एका फॅनला सापडला. त्याने हा चेंडू उचलला आणि चालत पुढे निघाला. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT