Harmanpreet Kaur Saam Tv
Sports

Harmanpreet Kaur News: देशासाठी काहीपण !आजारी असतानाही भारताची वाघीण शेवटपर्यंत लढली

हरमनप्रीत कौर आपल्या संघाला सामना जिंकवून देण्यात अपयशी ठरली. मात्र तिने केलेल्या कृत्याने कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले आहे.

Ankush Dhavre

ICC Woman's T20 WC: आयसीसी महिला टी -२० विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना गुरुवारी भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या रोमांचक सामन्यात दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली.

मात्र शेवटी ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारत हा सामना ५ धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावणारी हरमनप्रीत कौर आपल्या संघाला सामना जिंकवून देण्यात अपयशी ठरली. मात्र तिने केलेल्या कृत्याने कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले आहे.(Latest Sports Updates)

हरमनप्रीत कौरचे धाडसी कृत्य..

हरमनप्रीत कौर जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करत होती. त्यावेळी ती फिट असल्याचे दिसून येत होते. मात्र अनेकांना ही बाब माहीत नसेल की, मैदानात उतरण्याच्या एक दिवसाआधी ती आजारी होती.

सामन्याच्या पूर्वसंध्येला तिला स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यामुळे ती सेमीफायनलचा सामना खेळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र महत्वाच्या सामन्यात आजारी असताना तिने मैदानात जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या या धाडसी कृत्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

हरमनप्रीत कौर झाली रनआउट..

हरमनप्रीत कौर भारतीय संघासाठी महत्वाची खेळी करत होती. तिने या डावात ३४ चेंडूंचा सामना करत ५४ धावांची खेळी केली. तर १४ वे षटक सुरु असताना हरमनप्रीत कौरने लेग साईडच्या दिशेने शॉट मारला.

ती दोन धावा घेण्यासाठी धावली. खूप सहजरित्या २ धावा पूर्ण होतील असे वाटत असताना क्रीजमध्ये पोहचण्याआधीच तिची बॅट फसली आणि ती धावबाद झाली. अशा पध्दतीने बाद झाल्यामुळे ती संताप व्यक्त करताना दिसून आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जमिनीच्या व्यवहारांवर ITची नजर; 2 लाखांवरील रोखीचे व्यवहार रडारवर

डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप

मामाच्या मुलीशी लग्नावर बंदी येणार? नातेवाइकांमधील विवाह रोखण्यासाठी नवा कायदा?

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये बेशिस्त वाहतुकीचा फटका; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

ते एक वर्षभरापूर्वीचं वक्तव्य अन् सोने-चांदीचा भाव गडगडला; PM नरेंद्र मोदींनी सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT