hardik pandya saam tv
Sports

T-20 World Cup 2024: हार्दिक पंड्या टीम इंडियासोबत अमेरिकेला जाणार नाही; समोर आलं मोठं कारण

Hardik Pandya Latest News: टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू २ गटात अमेरिकेला रवाना होणार आहेत. दरम्यान हार्दिक पंड्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना २६ मे रोजी होणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १ जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू २ गटात वेस्टइंडीजला रवाना होणार आहेत. दरम्यान पहिला गट २५ मे रोजी अमेरिकेला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.तत्पूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. हार्दिक पंड्या पहिल्या आणि दुसऱ्या गटासोबत वेस्टइंडिजला जाणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

माध्यमातील वृत्तानुसार,हार्दिक पंड्या भारतात नाहीये. तो इंग्लंडमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेतोय. भारतीय संघ आपले सुरुवातीचे सामने अमेरिकेत होणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, भारतीय संघाचा पहिला गट २५ मे रोजी रात्री १० वाजता अमेरिकेला जाण्यासाठी रवाना होणार आहे. या गटात विराट कोहली,रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रिषभ पंतसारख्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. तर यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहल हे खेळाडू दुसऱ्या गटासोबत अमेरिकेला रवाना होणार आहे.

हार्दिक अमेरिकेला केव्हा जाणार?

नुकताच हार्दिक पंड्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो शेअर केला आहे. ज्यात तो स्विमिंग पुलमध्ये असल्याचं दिसून येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार हार्दिक पंड्या लंडनहून थेट अमेरिकेला जाऊ शकतो. त्यामुळे तो दोन्ही गटांसह अमेरिकेला जाणार नाही. आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु असल्याने भारतीय संघाने २ गटात अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज खेळाडू आयपीएल स्पर्धेत टीकून आहेत, ते खेळाडू दुसऱ्या गटासोबत वेस्टइंडिजला रवाना होणार आहेत. तर स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघातील खेळाडू पहिल्या गटासोबत अमेरिकेला रवाना होणार आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT