Hardik Pandya  yandex
Sports

Hardik Pandya: टेन्शन वाढवणारी बातमी! हार्दिक पंड्या या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

Hardik Pandya, Vijay Hazare News: हार्दिक पंड्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. तो आगामी विजय हजारे ट्रॉफीतील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

Ankush Dhavre

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला २१ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी मोठी अपडेट समोर येत आहे. या स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये हार्दिक पंड्या खेळताना दिसून येणार नाहीये.

काही दिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत हार्दिक पंड्या खेळताना दिसून आला होता. याच स्पर्धेत त्याने धावांचा पाऊस पाडला होता. मात्र आता तो सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार नाहीये.

काय आहे कारण?

माध्यमातील वृत्तानुसार, हार्दिक पंड्याने वैयक्तिक कारणास्तव सुरुवातीच्या काही सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुरुवातीचे काही सामने झाल्यानंतर हार्दिक पंड्या या स्पर्धेत कमबॅक करेल.

हार्दिक चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळताना दिसून येणार आहे. त्यामुळे त्याने मैदानात उतरणं गरजेचं आहे. आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात रंगणार आहे. मात्र ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सामने हे दुबईत खेळवले जाऊ शकतात.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हार्दिक पंड्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. हार्दिक कसोटी क्रिकेट खेळत नाहीये, मात्र तो वनडे आणि टी-२० क्रिकेट खेळतोय. गेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही त्याने दमदार कामगिरी केली होती. मात्र या स्पर्धेदरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं.

दरम्यान त्याने आयपीएल स्पर्धेतून दमदार कमबॅक केलं होतं. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ११ कसोटी सामन्यांमध्ये ३१.२९ च्या सरासरीने ५३२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १७ गडी बाद केले आहेत.

तर ८६ वनडे सामन्यांमध्ये त्याने ३४.०२ च्या सरासरीने १७६९ धावा केल्या आहेत. तर १०९ टी-२० सामन्यांमध्ये त्याने २७.८७ च्या सरासरीने १७०० धावा केल्या आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर त्याने आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतही दमदार कामगिरी केली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफीतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Post Offer: शंभर आमदार आणा अन् मुख्यमंत्री व्हा! दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सीएम पदाची ऑफर

Maharashtra Live News Update: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मृत महिलेचा आढळला

Viral Video: इच्छा असेल तर...; विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेवर चिकटवली २०० रुपयांची नोट, लिहिलेली शायरी वाचून पोट धरून हसाल

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

SCROLL FOR NEXT