hardik pandya yandex
क्रीडा

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हार्दिक पांड्याला देणार डच्चू? या खेळाडूची लागू शकते वर्णी

Sandeep Gawade

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल कर्णधारपदाच्या बाबतीत होऊ शकतो. हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवलं जाऊ शकतं. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवची वर्णी लागू शकते. रोहित शर्मासह टीमचे अनेक खेळाडू पांड्याच्या कर्णधारपदावर समाधानी नसल्याची माहिती आहे. तर सचिन तेंडुलकरही सूर्याच्या बाजूने असल्याची सूत्रांची माहितीआहे.

मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाला अल्टिमेटम दिला आहे. रोहित आणि सचिनसह अनेक खेळाडूंना पांड्याने कर्णधारपदी राहावं असं वाटत नाही. मुंबईने हार्दिकला कर्णधारपदावर ठेवलं तर रोहित आणि सूर्या सोबत वेगवान गोलंदाज गोलंदाज जसप्रीत बुमराही संघ सोडू शकतो. याबाबत मुंबई कॅम्पमध्ये सध्या खळबळ उडाली आहे.

मुंबईने IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्याला संघात स्थान दिलं. पांड्या आधी गुजरात टायटन्सकडून खेळत होता. हार्दिक पांड्या येताच रोहितकडून कर्णधारपद हिसकावून घेण्यात आलं. मुंबईने रोहितला याची माहिती दिली नाही. त्याला न सांगता हा निर्णय घेण्यात आला. त्याचा परिणाम मुंबईतील सामन्यांवरही दिसून आला, असं मिडिया रिपोर्ट्सचं म्हणणं आहे. यामुळे रोहित आणि त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले होते.

हार्दिक पांड्या टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनणार होता. पण हे होऊ शकलं नाही. त्याच्या जागी सूर्याला कर्णधारपद देण्यात आलं. जय शाहही पांड्याच्या बाजूने होते. मात्र अजित आगरकर तसेच इतर खेळाडू आणि रोहितचं या निर्णयाला समर्थन नव्हतं. जय शहामुळेच पांड्या काही काळ उपकर्णधार राहिला. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

SCROLL FOR NEXT