Hardik-Natasha Divorce 
Sports

Hardik-Natasha Divorce: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविने तीन प्रकारे केलं होतं लग्न, पाण्यासारखा खर्च केला पैसा

Hardik-Natasha Divorce: हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट झाला. ही धक्कादायक बातमी दोघांनी सोशल मीडियावर जाहीर केलीय. अवघ्या १८ महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हार्दिकने उदयपूरमध्ये लग्न केल होतं.

Bharat Jadhav

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून माध्यमांमध्ये होत होत्या. आता या दोघांनीही सर्व काही स्पष्ट केलंय. दोघांनी सर्व चर्चां खऱ्या असल्याचं सांगत आज सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोट घेतल्याचं सांगितलं. दरम्यान या दोघांनी एकत्र ४ वर्ष संसार केला, मात्र पुढे त्यांच्या सुखी संसाराला नजर आली आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान लग्नबंधनात मजबूत राहावं यासाठी दोघांनी एक नाही तर तब्बल तीन प्रकार विवाह केला होता. परंतु या दोघांचा संसार ४ वर्षापेक्षा जास्त काशळ टिकू शकला नाही. या तीन प्रकारे लग्न करताना या दोघांना मोठा पैसा खर्च केला होता.

हार्दिक आणि नताशा यांचे २०२० मध्ये लग्न झाले, पण ते फक्त ४ वर्षेच टिकले. या दोघांनी मे २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन असताना घाईघाईत कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर तीन महिन्यांनी अगस्त्यचा जन्म झाला तेव्हा त्यांनी १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे निवडला. यादिवशी दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन धर्माच्या रितीरिवाजानुसार पुन्हा लग्न केलं. हार्दिक पंड्याचा धर्म हिंदू आहे, तर सर्बियाची राहणाऱ्या नताशाचा धर्म ख्रिश्चन आहे.

२०२० मध्ये कोर्ट मॅरेज केल्यानंतर हार्दिकने २०२३ मध्ये पुन्हा लग्न केले. यावेळी हार्दिक आणि नताशाने रॅफल्स उदयपूर येथे डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. या काळात त्यांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला होता. चपला चोरण्याचा विधी हार्दिकची वहिनी पंखुरी शर्मा हिने पूर्ण केला.

यासाठी हार्दिकला परत बूट देण्यासाठी १ लाख रुपये मागितले, मात्र हार्दिकने त्याच्याकडून ५ लाख रुपये दिले होते. इतकंच नाही तर या लग्नादरम्यान त्यांनी व्हेन्यूपासून ते डिझाईन, वेडिंग प्लॅनर, आउटफिट इत्यादी सर्व गोष्टींवर भरपूर पैसा खर्च केला होता. वेडिंगसूत्र साइटनुसार, त्यांच्या वेन्यूची किंमत २-३ कोटी रुपये होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT