Who Is Natasha  
Sports

Hardik-Natasha Divorce: नताशा हार्दिकला देणार घटस्फोट? कोण आहे नताशा?

Who Is Natasha : सध्या क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा होतेय. यामुळे अनेकजण आता गुगलवर नताशा कोण आहे, याचा शोध घेत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नूतन कुलकर्णी, साम प्रतिनिधी

सध्या क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि नताशा यांच्यात घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. हे सर्व घडत असताना दोघांनी लग्नापूर्वी संपत्ती वाटपासंबंधी करार केल्याचीही चर्चा सुरू आहे.मात्र, याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. दोघांचा घटस्फोट झाला तर हार्दिकच्या संपत्तीतला 70टक्के वाटा नताशाला मिळेल, अशी माहिती होती. त्यानंतर या दोघांमध्ये लग्नापूर्वीच करार झाला होता, अशी माहिती मिळतेय. या सगळ्या प्रकरणानंतर नताशाविषयीची उत्सुकता वाढली आहे. कोण आहे नताशा, पाहूया, हा रिपोर्ट..

टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याला खऱ्या आयुष्यात क्लीन बोल्ड करणारी नताशा पुन्हा एकदा चर्चेत आहे ती दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेने. सध्या Who Is Natasha गुगलवर सर्वाधिक सर्च होतंय. तर मॉडेल, अॅक्ट्रेस आणि डान्सर असलेली 27 वर्षांची नताशा स्टेनकोव्हिक मूळची सर्बियाची. मात्र, तिलाही बॉलीवुडची भुरळ पडली आणि 2012 साली ती भारतात आली. 2013 मध्ये सत्याग्रह चित्रपटातून तिने बॉलिवुडमध्ये एन्ट्री केली. मात्र, नताशाला खरी प्रसिद्धी मिळाली ती 2014 मध्ये बिग बॉस 8मधून.

खरं तर त्याआधी ती तिचा बॉयफ्रेंड अली गोनीसोबत 'नच बलिए'च्या चौथ्या सिझनमध्ये दिसली होती. मात्र, बादशाहने तिला डीजेवाले बाबूमध्ये घेतलं आणि तिच्या डान्स टॅलेन्टचं कौतुक झालं. नताशा सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिचे 9 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. 2020 मध्ये हार्दिक आणि नताशा लग्नबंधनात अडकले. दोघांना अगस्त्य नावाचा मुलगाही आहे.

समुद्रातल्या बोटीतल्या एन्गेजमेंटपासून सुरू झालेल्या या प्रेम कहाणीचा शेवट खरंच घटस्फोटावर होणार का, याबाबत उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT