Harbhajan singh  Twitter
Sports

Harbhajan Singh: भज्जीने टाकला 'बॉल ऑफ द सेंच्युरी', युनिव्हर्स बॉसची दांडी उडवणारा हा बॉल एकदा पाहाच- VIDEO

Harbhajan singh : वर्ल्ड जायंट्स संघाविरुद्ध खेळताना त्याने असा काही चेंडू टाकला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Ankush Dhavre

Harbhajan singh ball of the century: भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग हा जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. क्रिकेटमधून निवृत्त होऊनही त्याची फिटनेस अजूनही तशीच आहे.

याची झलक लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत पाहायला मिळाली आहे. शनिवारी त्याने इंडिया महाराजा संघाचे प्रतिनिधित्व करताना म. (Latest sports updates)

वेस्ट इंडिजचा धाकड फलंदाज ख्रिस गेल फलंदाजी करता होता. त्यावेळी इंडिया महाराजा संघाकडून हरभजन सिंग गोलंदाजी करण्यासाठी आला. दरम्यान हरभजन सिंगने असा काही चेंडू टाकला की, सर्वच आश्चर्यचकित झाले.

इंडिया महाराजा संघाची गोलंदाजी सुरू असताना तिसरे षटक टाकण्याची जबाबदारी हरभजन सिंगकडे सोपवण्यात आली होती. त्याने सुरुवातीला २ वाइड चेंडू टाकले. त्यानंतर त्याने ख्रिस गेलला क्लीन बोल्ड केले.

शेन वॉर्नने टाकलेला बॉल ऑफ द सेंच्युरी सर्वांनाच माहित आहे. मात्र हरभजनने टाकलेला चेंडू देखील बॉल ऑफ द सेंच्युरीपेक्षा कमी नव्हता. त्याने डाव्या हाताचा फलंदाज ख्रिस गेलला लेग साईडच्या दिशेने चेंडू टाकला.

तो चेंडू इतका फिरला की, थेट लेग स्टंपला जाऊन धडकला. मुख्य बाब म्हणजे युनिव्हर्स बॉसला हा चेंडू किती फिरेल याचा अंदाज देखील घेता आला नाही.

फलंदाजासह गोलंदाजी करणाऱ्या हरभजन सिंगला देखील विश्वास बसत नव्हता की, त्याचा चेंडू इतका फिरू शकतो. सुरुवातीला असे वाटत होते की, ख्रिस गेलची बॅट स्टंपला लागली आहे. मात्र रीप्लेमध्ये पाहिले असता स्पष्ट दिसून आले की, चेंडू स्टंपला जाऊन धडकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

HIV Injection Attack : लगीन मोडल्यामुळे संतापला, तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही इंजेक्शन; वाचा सविस्तर

Trending Hairstyles: अस्सल मराठमोळा थाट! पैठणी साडीवर ट्राय करा 'या' 5 ट्रेडिंग हेअरस्टाईल्स

Shocking News: लग्नामध्ये रसगुल्ला खाताना घशात अडकला, पाहुण्याचा तडफडून मृत्यू

Viral Video: केस ओढले, लाथा बुक्क्यांनी मारहाण अन्....; विद्यापीठात विद्यार्थिनींचा राडा

SCROLL FOR NEXT