Hardik Pandya Natasa Divorce SAAM TV
Sports

Hardik Pandya Natasa Divorce: हार्दिकच्या प्रयत्नाने नातं वाचलं...; घटस्फोटांच्या चर्चांवर नताशाचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, हार्दिक सुधारला असता...!

Hardik Pandya Natasa Divorce: हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक यांच्या नात्यात दुरावा आला. यावेळी दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या सर्व प्रकरणात आता नताशाने मौन सोडलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक यांच्या नात्यात दुरावा आला. हा दुरावा इतका होता की, दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या प्रकरणानंतर सोशल मीडियावर अनेकांनी नताशाला ट्रोल केलं. मात्र आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्व प्रकरणात आता नताशाने मौन सोडलं आहे.

एका रिपोर्टनुसार, नताशाने स्वतः घटस्फोटाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. यावेळी तिने नातं तुटण्याचं कारणाचा खुलासा केला आहे. तिच्या म्हणण्यांनुसार, हार्दिकने आपली एखादी सवय सुधारली असती तर कदाचित हे नातं वाचू शकलं असतं. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

नताशाने स्वतः केला खुलासा?

टाईम्स नाऊमधील एका बातमीनुसार, हार्दिकला खूप ग्लॅमरस लाइफ आवडत असल्याचं समोर आलं आहे. मात्र नताशाला या गोष्टींची फारशी आवड नव्हती. काही कारणांमुळे ती याबाबत हार्दिकला सांभाळू शकली नाही. त्यामुळे त्यांच्यातील दुरावा वाढत गेला आणि प्रकरण इतके वाढलं की, दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

या रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार, नताशानेही हार्दिकच्या म्हणण्यानुसार स्वतःमध्ये बदल आणण्याचा प्रयत्न केला. पण तिला ही गोष्ट शक्य झाली नाही. तर दुसरीकडे हार्दिकने स्वतःमध्ये बदल केलेला नाही. दरम्यान त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होण्याचं कारण ठरलं होतं.

शांत आयुष्य व्यतीत करायचं होतं- नताशा

अनेक रिपोर्ट्सनुसार, असंही समोर आलंय की, अहवालांवर विश्वास ठेवला तर पंड्याने स्वतःमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जर हार्दिकने स्वतःमध्ये बदल केले असते तर नातं वाचवता आलं असतं.

पांड्याच्या ग्लॅमरस आयुष्यामुळे या दाम्पत्याच्या नात्यावर मोठा परिणाम झाला. नताशाला शांत जीवन जगायला आवडतं. इतंकच नाहीतर नातं तोडण्याचा हा निर्णय नताशासाठी खूप कठीण होता. हा निर्णय एका दिवसात किंवा आठवडाभरात घेतला गेला नाही, तर हळूहळू वाढत्या अंतरामुळे तिला हा निर्णय घ्यावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT