Hardik Pandya Saam TV
Sports

IPL 2022: हार्दीक पांड्याचा एक निर्णय अन् 4 आठवडे, 34 सामन्यानतंर बदलली कहाणी

आता गुजरात टायटन्सच्या कर्णधाराने असा निर्णय घेतला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Pravin

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) आयपीएल 2022 मध्ये पदार्पण करताना त्यांच्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर सर्वांना प्रभावित केले आहे. या संघाने अनेकवेळा शेवटच्या षटकांमध्ये बाजी फिरवत सर्वांनाच चकित केले आहे. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदालाही पसंती मिळत आहे. आता गुजरात टायटन्सच्या कर्णधाराने असा निर्णय घेतला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 26 मार्चपासून सुरू झालेल्या आयपीएल 2022 च्या जवळपास एक महिना पूर्ण झाल्यानंतर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणारा हार्दिक पांड्या पहिला कर्णधार ठरला आहे.

IPL 2022 च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. त्या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रेयस म्हणाला होता की, दुसऱ्या डावात दव असल्याने गोलंदाजी करणे कठीण आहे आणि अशा परिस्थितीत त्याने हा निर्णय घेतला. त्याचा फायदा त्याला झाला आणि संघ जिंकला. त्यानंतर प्रत्येक सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने हा नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

34 सामन्यांनंतर ट्रेंड बदलला

ही मालिका 26 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर सुरू झाली आणि 22 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवरच दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यापर्यंत सुरू राहिली. म्हणजेच 4 आठवडे आणि 34 सामन्यांपर्यंत कोणत्याही कर्णधाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला नाही, मात्र पहिल्यांदाच आयपीएलचे कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याने हा ट्रेंड बदलला आहे. शनिवार 23 एप्रिल रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर कोलकाता विरुद्धच्या सामन्यात, हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tune in Dress: फ्रेंडशिप डे ला हे ड्रेसेस घालून तुमच्या BFF सोबत करा ट्यून इन

Friendship Day 2025 : बॉलीवूडमधील ‘खऱ्या’ मैत्रीचे हे 6 खास किस्से; शाहरूख ते काजोल पर्यंत लगेचच वाचा

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार- तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न, पवार कुटुंब एकत्र; पाहा VIDEO

Pimpri Chinchwad : बांधकाम पाडले तर बाळाला फेकून आत्महत्या करेल; अतिक्रमण विरोधी पथकाला धमकावत शिवीगाळ, दोघांवर गुन्हा दाखल

Shreya Bugde: श्रेया बुगडेचं स्टायलिश फोटोशूट, फॅन्सकडून सौंदर्याचं होतय कौतुक

SCROLL FOR NEXT