ipl  x/twitter
Sports

RCB vs GT, IPL Final : प्रिन्स अन् किंग भिडणार... गुजरातच्या मैदानात आरबीसी कमाल करणार का? पाहा संभाव्य प्लेईंग ११

RCB vs GT news : आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्स विरोधात आरसीबीचा सामना होईल. जाणून घ्या दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग ११

Vishal Gangurde

आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरातची एन्ट्री

फायनलमध्ये गुजरात विरुद्ध बेंगळुरूचा होणार सामना

आयपीएल २०२६ क्लालीफायर-२ सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ७ विकेटने पराभूत केले. गुजरात टायटन्सने सामना जिंकत फायनलमध्ये धडाकेबाज एन्ट्री मारली आहे. आता गुजरातचा अंतिम सामना हा विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी रविवारी होईल. यंदाचा आयपीएलचा अंतिम सामना कोण जिंकणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ३१ मे रोजी सायंकाळी सात वाजता अंतिम सामना सुरू होईल. दोन्ही संघाचे कर्णधार सायंकाळी ७ वाजता नाणेफेकीसाठी मैदानात दिसतील. कालच्या सामन्यात गुजरात टायटन्ससमोर राजस्थान रॉयल्सचा संघ ढेर झाला.

मुल्लनपूर, न्य चंडीगडचे महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने २० षटकात ६ गडी गमावून २१४ धावा कुटल्या. राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने जोरदार फटकेबाजी केली.

गुजरात टायटन्स संघाने १८.४ षटकात २१९ धावा करत सामना जिंकला. गुजरातने ७ विकेटने सामना जिंकला. या विजयाने गुजरात टायटन्स संघाची फायनलमध्ये एन्ट्री झाली आहे.

वैभव सूर्यवंशीची ९६ धावांची खेळी व्यर्थ

राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली झाली नव्हती. अवघ्या ९ धावांच्या आत राजस्थानचे दोन गडी बाद झाले होते. परंतु संघाचा डाव वैभव सूर्यवंशीने सांभाळला होता. त्याने ४७ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकार लगावत ९६ धावा कुटल्या. सूर्यवंशीच्या व्यतिरिक्त रविंद्र जडेजाने ३५ चेंडूत ४५ धावा कुटल्या.

फायनलमध्ये पोहोचेल्या संघाची संभाव्य प्लेईंग कशी असेल?

आरसीबी संभाव्य प्लेईंग ११

विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्नर कुमार, जोश जोश हेजलवुड, रसिख सलाम डार, सुयश शर्मा

जीटी संभाव्य प्लेईंग ११

साइ सुदर्शन, शुभमन गिल, जोस बटलर,वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, जॅसन होल्डर, राहुल तेवतिया, रशिद खान, मानव सुथार, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer: दररोजच्या या ४ सवयी लावाच; पोटाच्या कॅन्सरचा धोका होतो ५० टक्क्यांनी कमी

Maharashtra News Live Update: आत्तापर्यंत महायुती सरकारने मदत केली आहे, जस संकट येईल तशी मदत करणार - मंत्री भरत गोगावले

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT