LSG vs GT  saam tv
Sports

IPL 2026: बटलर-गिलची अर्धशतकी खेळी; गुजरात टायटन्सचा लखनौवर ७ गडी राखून दणदणीत विजय

Gujarat Titans vs Lucknow Super Giants : आयपीएल 2026 मध्ये गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. जोस बटलर आणि शुबमन गिल यांच्या अर्धशतकांमुळे 165 धावांचे लक्ष्य सहज पार करण्यात यश आले.

Namdeo Kumbhar

गुजरात टायटन्सने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा ७ गडी राखून पराभव केला. जोस बटलर आणि कर्णधार शुबमन गिल यांच्या धडाकेबाज अर्धशतकांमुळे गुजरातने लखनौचे १६५ धावांचे लक्ष्य सहज पूर्ण केले. गुजरातचा हा दुसरा विजय ठरलाय. लखनौनं प्रथम फलंदाजी करताना १६४ धावांपर्यंत मजल मारली होती. लखनौचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. प्रसिद्ध कृष्णाने ४ विकेट घेत लखनौचे कंबरडे मोडले.

नाणेफेक जिंकून गुजरातने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौची सुरुवात काहीशी खराब झाली. स्फोटक फलंदाज मिचेल मार्श (११) स्वस्तात परतला. तर कर्णधार ऋषभ पंतने १८ धावांचे योगदान दिले. एडन मार्करमने २१ चेंडूत ३० धावा करत डावाला वेग देण्याचा प्रयत्न केला. परंतु तो मोठी खेळी करू शकला नाही. निकोलस पूरन (१९) आणि आयुष बदोनी (९) हे देखील स्वस्तात बाद झाले.

गुजरातच्या प्रसिध्द कृष्णाने भेदक गोलंदाजी करत ४ गडी बाद केले आणि लखनौच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. अखेरच्या षटकांत मुकुल चौधरी आणि मोहम्मद शमीने फटकेबाजी केल्यामुळे लखनौने २० षटकांत ८ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली.

बटलर-गिल जोडीची फटकेबाजी

१६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवातही सावध झाली. साई सुदर्शन १५ धावा करून बाद झाला. मात्र, त्यानंतर जोस बटलर आणि शुबमन गिल यांनी लखनौच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. जोस बटलरने अवघ्या ३७ चेंडूत ६० धावा ठोकल्या, तर शुबमन गिलने ४० चेंडूत ५६ धावांची संयमी पण आक्रमक खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर (२१*) आणि राहुल तेवतिया (१०*) यांनी उरलेली कसर पूर्ण केली. गुजरातने १८.४ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १६५ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. लखनौकडून मोहम्मद शमी, प्रिन्स यादव आणि दिगवेश राठी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला, पण ते धावसंख्या रोखण्यात अपयशी ठरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या मोर्चावेळी का संतापल्या टीना चौधरी? गिरीश महाजनांबाबत काय म्हणाल्या?

Fake Ghee Racket: गावरान तूप नाही तर चक्क जनावरांची चरबी, किळसवाण्या कारखान्याचा पर्दाफाश

स्वस्त गॅससाठी व्यावसायिकांचा जीवाशी खेळ; गॅस रिफिलचा व्यावसायिकांकडून गैरवापर?

BJP- Shivsena Alliance: भाजप- शिंदेसेना युती तुटणार? शिंदेंच्या शिलेदारानेच उघडले पत्ते

Shocking News: पोलिस महानिरीक्षकांवरच गंभीर गुन्हा दाखल; बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप

SCROLL FOR NEXT