GT vs PBKS IPL 2024 Main reason behind gujarat titans defeat against punjab kings amd2000 twitter
क्रीडा

GT vs PBKS, Match Highlights: १९ व्या षटकात केलेली ही चूक गुजरातला नडली! वाचा नेमकं काय घडलं?

Gujarat Titans vs Punjab Kings: गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान गुजरात टायटन्स संघाला घरच्या मैदानावर पराभूत व्हावं लागलं आहे.

Ankush Dhavre

Reason Behind Gujarat Titans Defeat:

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज (GT vs PBKS) या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान गुजरात टायटन्स संघाला घरच्या मैदानावर पराभूत व्हावं लागलं आहे. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना १९९ धावा केल्या होत्या. २०० धावांचा पाठलाग करताना पंजाबकडून युवा फलंदाज शशांक सिंग आणि आशुतोष शर्माची बॅट चांगलीच तळपली. शशांक सिंगने फलंदाजी करताना २९ चेंडूत ६१ धावा काढल्या. तर आशुतोष शर्माने १७ चेंडूत ३१ धावा चोपल्या. या विस्फोटक खेळी दरम्यान त्याने १ चौकार आणि ३ षटकार मारले.

एक चूक गुजरातला नडली?

या सामन्यात २०० धावांचा पाठलाग करत असलेल्या पंजाब किंग्ज संघाला विजयासाठी १२ चेंडूत २५ धावांची गरज होती. त्यावेळी १९ वे षटक टाकण्यासाठी मोहित शर्मा गोलंदाजीला आला. शेवटचे षटक टाकण्यात तरबेज असलेला मोहित शर्माने या षटकात एक मोठी चूक केली. त्याने या षटकात १८ धावा खर्च केल्या. (Cricket news in marathi)

या निर्णायक षटकात १८ धावा खर्च केल्यानंतर पंजाबच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. पंजाबला शेवटच्या षटकात विजयासाठी केवळ ७ धावा शिल्लक राहिल्या. हे आव्हान सहजरीत्या पार करत पंजाब किंग्जने हा सामना ७ गडी राखून जिंकला. या सामन्यात मोहित शर्माने ४ षटक टाकत ३८ धावा खर्च केल्या.

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने चांगली फलंदाजी तर चांगली केली. मात्र क्षेत्ररक्षणात काही चुका केल्या. सामन्यानंतर शुभमन गिलनेही हेच सांगितलं. गुजरातच्या क्षेत्ररक्षकांनी या सामन्यात कमीत कमी ३ झेल सोडले. या सामन्यानंतर बोलताना गिल म्हणाला की, ' १५ व्या षटकापर्यंत आम्ही सामन्यात होतो. खेळाडू जेव्हा झेल सोडतात तेव्हा नक्कीच संघाच्या अडचणी वाढतात.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

जगातील सर्वात महागडा तांदूळ तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे किंमत

Raj Thackarey News : हिंदुत्वाला तडा घालण्याचं काम शरद पवारांनी केलं; लालबागमधून राज ठाकरेंचा घणाघात|VIDEO

Kolhapur News : नाशिकनंतर कोल्हापुरात जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtrachi Hasya Jatra टीम झळकणार नवीन चित्रपटात, प्रसाद, सई, वनिताची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर, ‘गुलकंद चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT