team india twitter
Sports

IND vs AUS: टीम इंडियासाठी गुड न्यूज! स्टार फलंदाज चौथा कसोटी सामना खेळणार

Rohit Sharma, IND vs AUS 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असणार आहे. ही मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे.

त्यामुळे मालिका जिंकण्याच्या दृष्टीने पुढील सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो संघ मालिकेत २-१ ने आघाडी घेणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी जोर लावताना दिसतील. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाजी बातमी समोर येत आहे.

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाने कसून सराव सुरु केला आहे. दरम्यान नेट्समध्ये फलंदाजीचा सराव सुरु असताना, रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो अडचणीत असल्याचं दिसून आलं होतं.

दुखापतग्रस्त होताच त्याने फलंदाजी करणं थांबवलं आणि नेट्स सोडून बाहेर गेला. त्यावेळी असं म्हटलं जात होतं की, रोहित दुखापतीमुळे चौथ्या कसोटीतून बाहेर होऊ शकतो. मात्र आता भारतीय संघाला दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. रोहित शर्मा फिट असून तो चौथा कसोटी सामना खेळताना दिसून येईल.

रोहितचा फॉर्म ठरतोय चिंतेचा विषय

रोहित शर्मा फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरतोय. गेल्या १० डावात त्याला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

या मालिकेतही रोहितची बॅट शांतच होती. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो २ कसोटी सामने खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्याने गेल्या १० डावात २,५२,०,८,१८,११,३,३,६ आणि १० धावांची खेळी केली आहे.

रोहित सलामीला फलंदाजीला येतो. मात्र या मालिकेत तो मध्यक्रमात फलंदाजीला येतोय. तर डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. गेल्या २ सामन्यात त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे मेलबर्न कसोटीत त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT