kkr vs srh ipl 2024 final saam tv
Sports

IPL 2024 Final: IPL फायनलआधी फॅन्ससाठी गुड न्यूज! BCCI ने घेतला मोठा निर्णय

Reserve Day For IPL 2024 Final: आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये जाणारे २ संघ ठरले आहेत. फायनलचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हैदराबादचा संघ दुसऱ्यांदा तर कोलकाताचा संघ तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावण्यासाठी मैदानात येणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पाऊस या सामन्यात अडथळा निर्माण करु शकतो. असं झाल्यास अतिरिक्त १२० मिनिटांचा वेळ दिला जाईल. मात्र २६ मे रोजी हा सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर २७ मे रोजी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. उर्वरित सामना २७ मे रोजी खेळवला जाईल. मात्र राखीव दिवशीही पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजेता घोषित केलं जाईल.

गतवर्षी आयपीएल फायनलचे आयोजन अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर करण्यात आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यासाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला होता. पहिल्या दिवशी पावसाने तुफान बॅटिंग केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या सामन्याचा निकाल लागला. या सामन्यात चेन्नईने पाचव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं.

सनरायझर्स हैदराबाद:

जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यम, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, पॅट कमिन्स (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव , एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा, नितीश रेड्डी, मार्को जान्सेन, अभिषेक शर्मा.

कोलकाता नाईट रायडर्स:

श्रेयस अय्यर, केएस भरत, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, आंग्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन,वेंकटेश अय्यर. , सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन आणि मुजीब उर रहमान, वैभव अरोरा, चेतन अरोरा, चेतन राणा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentine Day Gifts: गर्लफ्रेंड किंवा बायकोला करा खूश; या व्हॅलेंटाईन डेला द्या 'हे' खास गिफ्ट्स

Maharashtra Live News Update: आमदार उत्तम जानकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; पोलिसांत तक्रार अर्ज

Hair Color Care: केसांना लावलेला रंग लगेच फिकट होतो? मग या 7 टिप्स करा फॉलो

Viral Video : आईचा गळा दाबला, बेदम मारहाण केली; पोटच्या मुलाचं संतापजनक कृत्य। पाहा Video

अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT