Glenn Phillips Saam TV
Sports

IPL 2022 च्या करोडपती फलंदाजाचा धमाका! 8 षटकार, 13 चौकारासह ठोकले शतक

सनरायझर्स हैदराबादने IPL 2022 च्या मेगा लिलावात 1.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

वृत्तसंस्था

IPL 2022 ला सुरुवात होण्याअगोदर लिलावात करोडपती बनलेल्या खेळाडूंनी त्यांचा ट्रेलर दाखवायला सुरुवात केली आहे. सध्या देशात रणजी ट्राफी (Ranji Trophy) सुरु आहे त्यात अनेक खेळाडू आपली छाप टाकत आहे. पण सध्या आपण ज्याबद्दल बोलणार आहोत तो न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज आहे. त्याने नुकतेच एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज शतक ठोकले आहे. त्याच्या नाबाद शतकाच्या जोरावर त्याच्या संघाने 79 चेंडू आधीच विजय मिळवला. त्याचं नाव आहे ग्लेन फिलिप्स.

फिलिप्सला सनरायझर्स हैदराबादने IPL 2022 च्या मेगा लिलावात 1.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते. म्हणजेच, आता आयपीएलच्या ऑरेंज आर्मीने स्वस्तात चांगला व्यवहार केला असं म्हणाले तर वावगं ठरणार नाही. ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) न्यूझीलंडच्या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत फोर्ड ट्रॉफीमध्ये शतक झळकावले आहे. कॅंटरबरी आणि ऑकलंड एसेस यांच्यात सामना होता. या सामन्यात फिलिप्स ऑकलंड एस साठी झंझावाती शतक ठोकून कॅंटरबरीच्या मोठ्या पराभवाचे कारण ठरला.

(Glenn Phillips)शतक झळकावण्यापूर्वी पकडले 2 झेल आणि घेतला 1 बळी

या सामन्यात कॅंटरबरीने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 9 गडी गमावून 226 धावा केल्या. एलजे कार्टरने संघाकडून सर्वाधिक 58 धावांची खेळी खेळली. याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकाचा उंबरठा ओलांडता आला नाही. ऑकलंडसाठी फलंदाजीपूर्वी क्षेत्ररक्षण करताना ग्लेन फिलिप्सने सामन्यात 2 झेल घेतले आणि 1 बळी घेतला.

ग्लेन फिलिप्सचे धडाकेबाज शतक, 8 षटकार ठोकले

ऑकलंडसमोर 227 धावांचे लक्ष्य होते. पण त्यांनी ते 50 व्या षटकापर्यंत वाट पाहिली नाही. उलट 37 व्या षटकातच खेळ संपवला. ग्लेन फिलिप्सची बॅट थांबण्याचे नाव घेत नव्हती. त्याने दमदार शतक ठोकून संघाला विजय मिळवून दिला आहे. ग्लेन फिलिप्सने 102 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. 139 मिनिटे क्रीजवर उभे राहून त्याने या धावा केल्या, ज्यात 8 षटकार आणि 13 चौकारांचा समावेश होता. फिलिप्सने मारलेल्या या नाबाद शतकामुळे ऑकलंडने 36.5 षटकांत 4 गडी गमावून सामना जिंकला. या सामन्यातील त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे शतकवीर फिलिप्सची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT