Gautam Gambhir on Cheteshwar Pujara Saam tv
Sports

Gautam Gambhir: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी गंभीरला हवा होता चेतेश्वर पुजारा, संघात घेण्यास कुणी दिला नकार?

Gautam Gambhir on Cheteshwar Pujara: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु होण्याआधी चेतेश्वर पुजाराला संघात घेण्यासाठी गौतम गंभीरने मागणी केली होती. पण त्याच्या ही मागणी अमान्य केली गेली.

Saam Tv

Gautam Gambhir Statement: भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील चौथा कसोटी सामना गमावला. हा सामना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या हिशोबाने महत्त्वपूर्ण होता. पराभवावरुन गंभीरने संपूर्ण संघाला खडे बोल सुनावले आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासंबंधिक एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, गौतम गंभीरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी चेतेश्वर पुजारा संघात हवा होता. पण त्याची ही मागणी अमान्य करण्यात आली.

द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या अहवालानुसार, भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण मागील काही कालावधीपासून विभागले गेले आहे. याचा परिणाम संघाच्या निवडीवरही झाला असून टीममध्ये अशांतता निर्माण झाली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी चेतेश्वर पुजाराला संघात समाविष्ट केले जावे यासाठी गौतम गंभीरने अनेकदा प्रयत्न केले होते. मात्र अजित आगरकर यांच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीने त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केले.

अहवालानुसार, पर्थ सामन्यापूर्वीच पुजारा टीममध्ये असावा असे भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरला वाटत होते. पुढे पर्थमधील सामना जिंकल्यावरही त्याच्या समावेशासाठी गंभीरने मागणी केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारताच्या प्राथमिक फळीतील फलंदाज प्रामुख्याने रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत मैदानात संघर्ष करत आहेत. पुजारा संघात आल्याने भारताचा डाव सावरु शकेल या उद्देशाने गौतम गंभीरने प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद स्विकारल्यानंतर गौतम गंभीरने काही निर्णय घेत आपल्या मतानुसार बदल केले. यावरुन वादही झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेषत: हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीबाबत गंभीरच्या निर्णयावर ड्रेसिंग रुममध्ये एकमत नसल्याचे म्हटले जात आहे. भारतीय खेळाडूंनी मैदानात चांगला खेळ न केल्याने गौतम गंभीरने निराशा व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT