gautam gambhir with rohit sharma saam tv news
क्रीडा

Gautam Gambhir Head Coach: गंभीर हेड कोच बनताच टीम इंडियात बदल होणार? BCCI समोर ठेवली ही मोठी अट

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर हा भारतीय संघाचा पुढील मुख्यप्रशिक्षक होणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे. राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरचं नाव आघाडीवर होतं. राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर संपणार आहे. लवकरच बीसीसीआय गौतम गंभीरच्या नियुक्तीबाबत अधिकृत घोषणा करणार आहे.

बीसीसीआयने दिलेला प्रस्ताव गंभीरने मान्य केला, मात्र काही अटी शर्ती देखील ठेवल्या. बीसीसीआयच्या एका सूत्राने दैनिक भास्करला दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने गंभीरसोबत चर्चा केली असून टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर तो राहुल द्रविडची जागा घेणार आहे.'

या वृत्तात असंही म्हटलं गेलं आहे की, जर त्याला स्वतःहून सपोर्ट स्टाफ निवडण्याची अनुमती दिली गेली तरच तो या पदाचा स्वीकार करेल. बीसीसीआयने त्याची ही अट मान्य केली असून लवकरच तो मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ स्वीकारणार आहे. सध्या राहुल द्रविड हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. तर विक्रम राठोड फलंदाजी प्रशिक्षक, पारस म्हाम्ब्रे गोलंदाजी प्रशिक्षक आणि टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. यापूर्वी रवी शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.

या वृत्तात असा देखील दावा करण्यात आला आहे की, गौतम गंभीर केवळ सपोर्ट स्टाफमधील सदस्यांमध्ये नव्हे तर संघातील खेळाडूंमध्ये देखील बदल करणार आहे. गौतम गंभीरने २०२२ आणि २०२३ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर २०२४ मध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. याचवर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tip: सतत घाम येतोय? आहारात करा 'हा' छोटा बदल!

Accident News: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात.. आधी महिलेला धडक, नंतर कार थेट दुकानात , १ गंभीर जखमी

Viral Video: तरुणांना चढला नवरात्रीचा फिवर, ''जय माता दी'' म्हणत दिल्ली मेट्रोमध्ये गायलं गाणं; व्हायरल VIDEO ची जोरदार चर्चा

Akola News : संतापजनक! निर्दयी बापाने 2 चिमुकल्या मुलींना नदीत फेकलं; मन सुन्न करणारी घटना, आरोपीला अटक

Lakshmi Narayan Rajyog: ४ दिवसांनी तूळ राशी बनणार लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींच्या संपत्तीत होणार वाढ

SCROLL FOR NEXT