cricketers death news  saam tv news
Sports

Cricketer Death News: क्रिकेट विश्वावर शोककळा! न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूचे निधन

Derek Alexander Stirling: क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटूने जगाचा निरोप घेतला आहे.

Ankush Dhavre

Derek Alexander Stirling Passed Away:

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू डेरेक स्टर्लिंग यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डेरेक यांनी १९८४ ते १९८६ दरम्यान न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केलं. ते वेगवान गोलंदाज होते.

अशी राहिलीये कारकिर्द..

डेरेक स्टर्लिंग यांना दोन वर्ष न्यूझीलंड संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांनी ६ वनडे आणि ६ कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केलं. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांना १३ गडी बाद करता आल्या. तर वनडे क्रिकेटमध्ये त्यांना ६ गडी बाद करता आले. इवेन चॅटफिल्ड, रिचर्ड हॅडली आणि लान्स केर्न्स यासांरख्या दिग्गज गोलंदाजांनी एक काळ गाजवला.त्यांच्या युगात खेळलेल्या डेरेक स्टर्लिंग यांना आपली छाप सोडता आली नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी..

डेरेक स्टर्लिंग यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी ३३.७२ च्या सरासरीने आणि २०६ गडी बाद केले होते. यादरम्यान ६ गडी बाद करुन ७५ धावा ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. (Latest sports updates)

तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यांना ६५ सामने खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यांमध्ये त्यांनी २२.२६ च्या सरासरीने ९० गडी बाद केले होते. यादरम्यान १० धावा खर्च करत ४ गडी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'लव्ह अँड वॉर'च्या सेटवर भयंकर अपघात; कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, संजय लीला भन्साळी नुकसान भरपाई करणार

Rain Alert : मुंबईत अखेर मान्सूनचे दमदार आगमन, पुढील काही तास महत्त्वाचे; वाचा हवामानाचा अंदाज

जिमला न जाता मेथी, ओवा आणि बडीशेपचं पाणी प्या, पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! ओमराजेंसह ६ बंडखोर खासदार आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT