team india saam tv
Sports

World Cup 2023: वर्ल्डकपसाठी दिग्गजाने निवडला भारतीय संघ! संघातील या २ प्रमुख खेळाडूंना ठेवलं संघाबाहेर

k srikkanth: आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी माजी खेळाडूने भारताचा संघ निवडला आहे.

Ankush Dhavre

Team India Squad For World Cup 2023:

आगामी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू के श्रीकांत यांनी वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंचा १५ सदस्यीय संघ निवडला आहे.

या संघात सर्वात जास्त आश्चर्यतकीत करणारी बाब म्हणजे के श्रीकांत यांनी संघातील २ प्रमुख खेळाडूंना बाहेर ठेवलं आहे.

के श्रीकांत यांनी वर्ल्डकपसाठी निवडला भारतीय संघ..

के श्रीकांत यांनी वर्ल्डकप स्पर्धेसाठी कर्णधार रोहित शर्मा,युवा फलंदाज शुबमन गिल आणि ईशान किशनची सलामीवीर फलंदाज म्हणून निवड केली आहे.

तर मध्यक्रमात फलंदाजी करण्यासाठी त्यांनी केएल राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यांनी ईशान किशन आणि केएल राहुलला संघात स्थान दिले आहे.

अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूंना दिलं स्थान..

के श्रीकांत यांनी निवडलेल्या संघात हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूरला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान दिले गेले आहे. या संघातून त्यांनी श्रेयस अय्यर आणि आर अश्विनला बाहेर ठेवलं आहे.

आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात स्थान न मिळालेल्या युजवेंद्र चहलला के श्रीकांत यांनी वर्ल्डकप संघात स्थान दिले आहे.

चहलसह त्यांनी फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला संघात स्थान दिलं आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजची निवड केली आहे. (Latest sports updates)

असा आहे के श्रीकांत यांनी निवडलेला भारतीय संघ:

रोहित शर्मा, शुभमन गिल,ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,केएल राहुल,हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा,अक्षर पटेल,शार्दुल ठाकुर,युजवेंद्र चहल,कुलदीप यादव,जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT