ipl trophy saam tv news
Sports

Wasim Jaffer Statement: IPL स्पर्धेतील हा नियम रद्द करा! भारताच्या माजी खेळाडूची मागणी,कारण सांगत म्हणाले...

Wasim Jaffer On Impact Player Rule: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी आयपीएलच्या एका नियमावरून नाराजी व्यक्त केली आहे.

Ankush Dhavre

Wasim Jaffer Statement On Impact Player Rule:

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी आयपीएलच्या एका नियमावरून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, हा नियम खेळाडूंसाठी चिंता वाढवण्याचं कारण ठरू शकतो. कुठला आहे तो नियम? आणि काय म्हणाले वसीम जाफर? जाणून घ्या.

आयपीएल २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. सर्वत्र या स्पर्धेची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. कारण येत्या १९ डिसेंबर रोजी दुबईत या स्पर्धेसाठी लिलाव सोहळा पार पडणार आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेअर या नव्या नियमाचा अवलंब केला गेला होता.

या नियमानुसार सामना सुरू असताना दोन्ही संघांना एक खेळाडू बाहेर बसवून त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळते. हा नियम काढून टाकला गेला पाहिजे असं वसीम जाफर यांचं म्हणणं आहे.

वसीम जाफर यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ' मला असं वाटतं की, आयपीएलमधून इम्पॅक्ट प्लेअर (Impact Player Rule)iplip हा नियम काढून टाकण्याची गरज आहे. कारण हा नियम अष्टपैलू खेळाडूंना गोलंदाजी करण्यासाठी प्रोत्साहित करत नाहीये. अष्टपैलू खेळाडूंची कमी आणि फलंदाजांचं गोलंदाजी न करणं हे भारतीय संघांसाठी चिंता वाढवणारं आहे.' (Latest sports updates)

काय आहे इम्पॅक्ट प्लेअर नियम?

या नियमानुसार दोन्ही संघ प्लेइंग ११ मधील खेळाडूंव्यतिरिक्त ५ आणखी खेळाडूंची नावं देऊ शकतात. या ५ पैकी एका खेळाडूला डाव सुरू होण्याआधी, षटक संपल्यानंतर, कोणाची विकेट गेल्यानंतर किंवा रिटायर्ड हर्ट केल्यानंतर प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली जाते. चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे हे आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच इम्पॅक्ट प्लेअर बनला होता. त्याला अंबाती रायुडूच्या जागी संघात स्थान दिलं गेलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT