shubman gill  saam tv news
Sports

IND vs ENG: गिलने कितव्या क्रमांकावर फलंदाजीला यावं? दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला

Wasim Jaffer: भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल सध्या सुपरफ्लॉप दिसतोय. नुकताच भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने शुभमन गिलला मोलाचा सल्ला दिला आहे.

Ankush Dhavre

Wasim Jaffer On Team India:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला. हैदराबादच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यातील दोन्ही डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली होती.

तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहेय. दरम्यान या फ्लॉप कामगिरीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटूने त्याला कितव्या क्रमांकावर खेळावं याबाबत मोलाचा सल्ला दिला आहे.

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने ट्विट करत लिहीले की,'शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करु शकतात. तर रोहितने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावं. मला असं वाटतं की,दुसऱ्या कसोटीत रोहितने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं. आपली फलंदाजी येण्याची वाट पाहणं हे शुभमन गिलसाठी योग्य नाही. त्यामुळे त्याने सलामीला येणं योग्य ठरेल. रोहित शर्मा स्पिन गोलंदाजी चांगल्या पद्धतीने खेळून काढतो,त्यामुळे मला वाटतं की रोहितने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं.'

शुभमन गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात सलामीवीर फलंदाज म्हणून केली. मात्र गेल्या वर्षी वेस्टइंडीज दौऱ्यावर त्याने सलामीची जबाबदारी यशस्वी जयस्वालकडे सोपवली आणि स्वत: तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याला कसोटीत एकही मोठी खेळी करता आलेली नाही. तर जयस्वालने सलामीची जबाबदारी मिळताच शतक झळकावलं होतं. (Cricket news in marathi)

हैदराबाद कसोटीतील पहिल्या डावात शुभमन गिल २३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो एकही धाव न करता माघारी परतला. या दोन्ही डावात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. तर सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने पहिल्या डावात ८० धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात तो १५ धावा करत माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अपघातापूर्वी अजितदादांना शेवटचा कॉल कोणी आणि कशासाठी केला? नवी माहिती आली समोर

Maharashtra Live News Update: शिवजयंतीनिमित्त अलिबागमध्ये मिरवणूक, शिवरायांच्या जयजयकारात दुमदुमला परिसर

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

SCROLL FOR NEXT