cricket bat and ball canva
Sports

Cricketer Death News: क्रिकेट विश्वाला मोठा धक्का! भारताच्या स्टार खेळाडूने आत्महत्या करत संपवलं जीवन

David Johnson Death: भारतीय संघाच्या माजी खेळाडूने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे.

Ankush Dhavre

भारताचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी (२० जून) बंगळुरुत त्यांचं निधन झालं आहे. डेव्हिड जॉन्सन यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९७१ रोजी झाला होता. दरम्यान १९९० साली त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांना भारतीय संघाकडून केवळ २ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली.

डेव्हिड जॉन्सन यांच्या अचानक जाण्याने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेंसह, गौतम गंभीर, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

डेव्हिड जॉन्सन हे बंगळुरुत राहत होते. असं म्हटलं जात होतं की, त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. घटना घडताच कोट्टानूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

अशी राहिली कारकिर्द

डेव्हिड जॉन्सन यांना भारतीय संघाकडून २ कसोटी आणि १ वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. १९९६ मध्ये ते भारतीय संघासाठी शेवटचा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरले होते. वनडे क्रिकेटमध्ये कमी सामने खेळण्याची संधी मिळाली असली तरीदेखील त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी कर्नाटक संघाचं प्रतिनिधित्व केलं. दरम्यान १९९५-९६ मध्ये झालेल्या रणजी हंगामात त्यांनी शानदार गोलंदाजी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Paint: नेल पेंट लावण्याचे 'हे' दुष्परिणाम माहितीये का?

Maharashtra Politics : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला झटका, बड्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra Live News Update: सांगलीत १५ ऑगस्टला मटण, चिकन विक्रीवर बंदी

Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; मनोरंजन विश्वावर शोककळा

Typhoid: टायफॉइडची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT