virat kohli with rohit sharma, IND vs SL saam tv
Sports

Team India Batting Coach: विराट- रोहितला बॅटिंगचे धडे द्यायला इंग्लंडचा हा दिग्गज उस्तुक, पोस्ट करत म्हणाला..

Kevin Pietersen Reaction On Team India Batting Coach: बीसीसीआय आता गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाफमध्ये फलंदाजी प्रशिक्षकाची भर घालणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Ankush Dhavre

राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतली. आता बीसीसीआय गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल करण्याच्या विचारात आहे.

भारतीय संघाला स्पेशल फलंदाजी प्रशिक्षक मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ही बातमी बाहेर येताच, इंग्लंडच्या माजी फलंदाजाने भारतीय संघाला प्रशिक्षण देण्याची ईच्छा व्यक्त केली आहे.

भारतीय संघाला प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक

भारतीय संघाला नवा फलंदाजी प्रशिक्षक मिळणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. या चर्चेला हवा मिळताच, इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनने पोस्ट शेअर करत रिअॅक्शन दिली आहे. सोशल मीडियावर, भारतीय संघाला नवा फलंदाजी प्रशिक्षक मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान, या पोस्टवर रिअॅक्शन देत पीटरसनने लिहिले, 'उपलब्ध..', आता खरंच बीसीसीआय फलंदाजी प्रशिक्षकाची नियु्क्ती करणार का? जर फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती केली, तर पीटरनसला ही जबाबदारी दिली जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

गंभीर- पीटरसन एकत्र येणार?

गौतम गंभीर आणि केविन पीटरसन यांना एकमेकांविरुद्ध खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. मात्र दोघांनी एकत्र काम केलेलं नाही. दोघेही आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. जर पीटरसनने ही जबाबदारी स्वीकारली तर याचा फायदा विराटला होऊ शकतो.

कारण विराट आणि पीटरसन दोघेही चांगले मित्र आहेत. दोघांनाही एकत्र खेळण्याचा अनुभव आहे. यासह जेव्हा जेव्हा विराटवर टीका केली गेली आहे,तेव्ह पीटरसनने पुढाकार घेत विराटची पाठराखण केली आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची निवड करण्यात आली. गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाफमध्ये रायन टेन डोईशे, अभिषेक शर्मा आणि मॉर्ने मॉर्केलचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT