archery players and coach  saam tv
Sports

Archery Asia Cup: महाराष्ट्राचे ५ तिरंदाज साधणार आशिया करंडक स्पर्धेत लक्ष्य

ही स्पर्धा प्रत्यक्ष उद्यापासून सुरु हाेणार असून १२ मे पर्यंत चालणार आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : इराक (iraq) येथे आयाेजिलेल्या तिरंदाजीच्या (archery) आशिया करंडक (स्टेज २) (archery asia cup stage II) स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील (maharashtra) पाच खेळाडूंची भारतीय संघात (indian archery team) निवड झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारतीय संघास (indian team) महाराष्ट्रातील दाेन नामवंत प्रशिक्षक (Coach) मार्गदर्शन करणार आहेत. (archery latest marathi news)

भारतीय संघात रिशब यादव (दिल्ली) , प्रथमेश जावकर (महाराष्ट्र), कुशल (हरियाणा), प्रथमेश फुगे (महाराष्ट्र), आदिती स्वामी (महाराष्ट्र), साक्षी चौधरी (हरियाणा), प्रणित कौर (पंजाब), प्रगती (दिल्ली), ज्वेल सरकार(पश्चिम बंगाल), विनायक वर्मा (दिल्ली), पार्थ साळुंखे (महाराष्ट्र), मृणाल चव्हाण (झारखंड), भजन गौर (हरियाणा), तीशा संचेती (महाराष्ट्र), लक्ष्मी हेमब्रोम (झारखंड), अवनी (हरियाणा ) यांचा समावेश आहे.

या संघास चंद्रकांत इलग (महाराष्ट्र) आणि प्रवीण सावंत (महाराष्ट्र), मंजीत मलिक (हरियाणा) विकास उपाध्याय (झारखंड) हे मार्गदर्शन करणार आहेत. या संघास सायकॉलॉजिस्ट म्हणून करणबीर सिंग व फिजिओथेरपिस्ट विजित गर्ग व प्रिया जयस्वाल हे मार्गदर्शन करणार आहेत. ही स्पर्धा प्रत्यक्ष उद्यापासून सुरु हाेणार असून १२ मे पर्यंत चालणार आहे अशी माहिती भारतीय धनुर्विद्या संघटनेचे महासचिव प्रमोद चांदुरकर, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT