ipl records  saam tv
Sports

IPL 2023 Playoffs: IPL च्या इतिहासात '२१ मे' ही तारीख नेहमी लक्षात ठेवली जाईल, वाचा नेमकं काय घडलं?

IPL 2023 Records: या दोन्ही सामन्यांमध्ये असं काही घडलं जे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं.

Ankush Dhavre

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पार पडला. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने जोरदार विजय मिळवला.

तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला धूळ चारत जोरदार विजय मिळवला.

या विजयासह मुंबईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. दरम्यान या दोन्ही सामन्यांमध्ये असं काही घडलं जे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं.

रविवारी झालेल्या सामन्यांमध्ये चारही संघांमध्ये विजय मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळाली.पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभूत केलं आणि प्लेऑफमधलं स्थान जवळ जवळ निश्चित केलं.

तर गुजरात टायटन्स संघाने मुंबई इंडियन्स संघाचं काम आणखी सोपं करून दिलं. अटीतटीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत करत गुजरातने ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला. तर १६ गुणांसह मुंबईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पाहिलांदाच असं घडलं..

कॅमेरून ग्रीनचं शतक..

महत्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवण्यासाठी २०० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने ५६ धावांची खेळी केली. तर कॅमेरून ग्रीनने सुरुवातीपासून तांबडतोड फलंदाजी करत ४७ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ८ षटकारांचा साहाय्याने १०० धावांची खेळी केली. हे कॅमेरून ग्रीनने आयपीएल स्पर्धेतील पहिले शतक ठरले. (Latest sports updates)

विराटचं विराट शतक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या सामन्यात विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी महत्वाची खेळी केली. त्याने सुरुवातीला फाफ डू प्लेसिस सोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली.

डू प्लेसिस बाद झाल्यानंतर विराटने ६१ चेंडूंचा सामना करत १३ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने १०१ धावांची खेळी केली. विराट कोहलीचे हे आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सातवे शतक आहे.

शुभमन गिलचं शतक..

गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९८ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना शुभमन गिलने संघाला चांगली सुरुवात करून दिली. यासह त्याने या डावात ५२ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ८ षटकारांचा साहाय्याने १०४ धावांची खेळी केली. हे शुभमन गिलचे या हंगामातील दुसरे शतक ठरले.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं. जेव्हा एकाच दिवशी ३ फलंदाजांनी शतक झळकावले. २ महत्वाच्या सामन्यांमध्ये ३ फलंदाजांनी आपल्या संघासाठी शतक पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT