BCCI Saam Tv
Sports

World Cup 2023: वर्ल्डकपपूर्वी BCCI ला मोठा धक्का! या कारणामुळे झालं लाखोचं नुकसान

Fire breaks out at Eden Gardens Stadium: या स्पर्धेच्या पार्श्वभुमीवर ईडन गार्डन्स स्टेडीयमच्या सुशोभिकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

Ankush Dhavre

Fire in Eden Gardens Kolkata:

भारतात ५ ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा सुरू व्हायला अवघे २ महिने शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेच्या पार्श्वभुमीवर ईडन गार्डन्स स्टेडीयमच्या सुशोभिकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

मात्र हे काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. ईडन गार्डन्स स्टेडीयमच्या मोठी आग लागली आहे. ही आग इतकी मोठी होती की, आग विझवणासाठी १ तासाहुन अधिकचा अवधी लागला आहे. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असल्याची माहिती समोर आली आहे.

ही आग ९ ऑगस्टच्या रात्री ११ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास लागली असल्याची माहिती समोर आली आहे.इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आग लागताच फायर ब्रिगेडच्या २ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. ही आग ड्रेसिंग रूममध्ये लागल्याने खेळाडूंचं सामान जळून खाक झालं आहे. या स्टेडियममध्ये वर्ल्डकप स्पर्धेतील काही महत्वाचे सामने खेळवले जाणार आहेत. मात्र या घटनेमुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सेमी फायनलचा सामना ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. या मैदानावर एकुण ५ सामने खेळवले जाणार आहेत. या घटनेनंतर आता बंगाल क्रिकेट असोशियनने चौकशी करायला सुरूवात केली आहे. तसेच आग लागण्यामागचं नेमकं कारण काय? याचा देखील शोध आता बंगाल क्रिकेट असोशियन घेणार आहे. बंगाल क्रिकेट असोशियनने १४ ऑक्टोबरपर्यंत स्टेडियमच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान ठेवले आहे. (Latest sports updates)

ईडन गार्डन्सच्या मैदानावर होणार या सामन्यांचे आयोजन..

ईडन गार्डन्सच्या मैदानावर २८ ऑक्टोबर रोजी नेदरलँड विरूद्ध बांगलादेश हा सामना खेळवला जाणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरूद्ध बांगलादेश, ५ नोव्हेंबर रोजी भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका तर ११ नोव्हेंबर रोजी इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान सामन्याचे आयोजन याच मैदानावर केले जाणार आहे. तसेच १६ नोव्हेंबर रोजी स्पर्धेतील सेमीफायनलचा दुसरा सामना याच मैदानावर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

बडतर्फ पोलीस अधिकारी निघाला दरोडेखोर; कारागृहातच शिजवला SBI लुटीचा कट

दिल्लीत 'इंडिया'-भाजप आमनेसामने; रामलीलावर इंडिया आघाडीचा महामोर्चा

महादेव बेटिंगचा किंग अखेर भारतात! CBI ची मोठी कारवाई! आता होणार मोठे खुलासे?

मंत्री पंकजा मुंडे बनल्या मॉडेल! पंकजाताईंचा रॅम्प वॉक पाहिला का?

SCROLL FOR NEXT