Viral Catch video twitter
क्रीडा

Viral Cricket Fight: लाईव्ह क्रिकेट सामन्यात राडा! आधी लाथा, बुक्यांनी मारलं मग उचलून आपटलं- VIDEO

Viral Cricket Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात फलंदाज बाद झाल्यानंतर, फलंदाज आणि गोलंदाजामध्ये जोरदार राडा झाला आहे.

Ankush Dhavre

Fight In Cricket: क्रिकेटमध्ये खेळाडू आक्रमक होणं हे नॉर्मल आहे. स्लेजिंग करणं विरोधी संघातील खेळाडूंना डिवचणं हा क्रिकेट खेळातील एक भाग आहे. जेव्हा दोन बलाढ्य संघ आमनेसामने येतात, तेव्हा अशा घटना घडत असतात.

मात्र तुम्ही कधी दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना पाहिलीये का? क्वचितच पाहिली असेल. मात्र अशी घटना, यूएईमध्ये सुरु असलेल्या एका स्पर्धेत घडल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात तुम्ही पाहू शकता की, ऐरोविसा आणि राबदान या दोन्ही संघांमध्ये क्रिकेटचा सामना सुरु होता. या सामन्यात रबदान संघातील फलंदाज बाद झाला, त्यावेळी ऐरोविसा संघातील गोलंदाजाने आक्रमक सेलिब्रेशन केलं. हे सेलिब्रेशन इतकं आक्रमक होतं की, गोलंदाज बाद झालेल्या फलंदाजाच्या तोंडासमोर जाऊन जोरजोरात ओरडू लागला.

जोर जोरात ओरडून झाल्यानंतर त्याने फलंदाजाला मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला. फलंदाजाने काहीवेळ सहनशिलता दाखवली. मात्र त्याचा संयमाचा बांध फुटल्यानंतर त्याने गोलंदाजाला प्रत्युत्तर दिलं. हे पाहून गोलंदाज आणखी तापला.

गोलंदाज रागात फलंदाजाकडे जात होता इतक्यात यष्टीरक्षकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, बघता बघता हा वाद आणखी वाढला. दोन्ही संघातील खेळाडूंनी दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनी एकमेकांना उचलून आपटलं. दोघांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली.

एकाने तर त्याला मारण्यासाठी रागात बॅट उचलली. मात्र तो थोडक्यात बचावला. हे प्रकरण काही वेळ असंच सुरु होतं. त्यानंतर हा वाद मिटला. मात्र या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT