lionel messi Julian alwarez olivier giroud and kylian mbappe saamtv
Sports

FIFA WC Final: सामान्य कुटूंबातील 'हे' पाच खेळाडू बनले फुटबॉल स्टार, असा होता स्ट्रगलर ते स्टार होण्याचा संघर्षमय प्रवास

अंतिम सामन्यात गतविजेता फ्रान्स आणि लियोनेल मेस्सीचा बलाढ्य अर्जेंटिना संघ आमने सामने येणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

FIFA WC Final: फीफा विश्चषकाचा अंतिम सामना अवघ्या काही तासांवर येवून ठेपला असून यामध्ये गतविजेता फ्रान्स आणि लियोनेल मेस्सीचा बलाढ्य अर्जेंटिना संघ आमने सामने येणार आहेत. या अंतिम सामन्यात लियोनेल मेस्सी, ज्युनिअल अल्वारेज, कीलियन एम्बाप्पे, अँटोनी ग्रिजमन आणि ओलिवियर गिरोद या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असेल. पाहूया सामान्य कुटूंबातील या खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास.

1. लियोनेल मेस्सी - फायनल मधील स्टार खेळाडू म्हणून मेस्सीकडे पाहिले जाईल. 7 ऑगस्ट 2005 रोजी, मेस्सी अर्जेंटिनाकडून हंगेरीविरुद्धच्या सामन्यात तो पहिल्यांदा खेळला. ड्रिब्लिंग करताना हंगेरियन बचावपटूला कोपर मारल्यानंतर 45 सेकंदात त्याला रेफ्रींनी बाहेर पाठवले होते. सहकाऱ्यांनी साथ दिली पण मेस्सीनेच मैदान सोडले.आज मेस्सी त्याच अर्जेंटिना संघाचा कर्णधार आहे.

मेस्सीला स्पेनकडून खेळण्याची ऑफरही आली होती. तेव्हा स्पेनचा संघ खूप मजबूत होता. या संघाने 2008 ते 2012 पर्यंत अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या. यामध्ये फिफा विश्वचषक 2010 चा समावेश होता. मात्र मेस्सीने स्पेनला जाण्याऐवजी अर्जेंटिनात खेळण्याचा निर्णय घेतला होता.

2. ज्युलियन अल्वारेझ- कॉर्डोबा प्रांताच्या मध्यभागी असलेल्या कॅल्चिन या छोट्या गावात या खेळाडूचा जन्म झाला. राफेल वरस हे त्याचे पहिले प्रशिक्षक होते. वरसने दिवसा ड्रायव्हर म्हणून काम केले आणि रात्री अ‍ॅटलेटिकोमध्ये अल्वारेझला प्रशिक्षण दिले. त्यांनी अल्वारेझची प्रतिभा ओळखली. याबद्दल ते म्हणतात की, मला आठवतंय, जेव्हा तो 8 किंवा 9 वर्षांचा होता, तेव्हा त्याने चार-पाच प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आणि एक गोल केला. तेव्हाच मला जाणवले की हा वेगळ्या प्रकारचा खेळाडू आहे जो जागतिक स्टार होऊ शकतो. अल्वारेझ आपल्या पहिल्या प्रशिक्षकाची मेहनतही विसरला नाही आणि तो फुटबॉल स्टार बनला.

3. ऑलिव्हियर गिरोद - हा फुटबॉल इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. गिरोदने मॉन्टपेलियरसोबत फक्त 2 हंगामात सलग 86 सामने खेळले तर अबू डायबीसारखे खेळाडू 6 हंगामात आर्सेनलसाठी 112 सामने खेळू शकले. गिरोद सहकारी फुटबॉलपटू कोसिलनीच्या अगदी जवळचा मानला जात होता. दोघेही ड्रेसिंग रूममध्ये, बसमध्ये, टीमचे फोटो, ट्रेनिंग, टेनिस आणि डिनरमध्ये एकत्र होते.. वयाच्या 25 व्या वर्षी फ्रान्सकडून पदार्पण करणाऱ्या गिरोदने आतापर्यंत 119 सामन्यांत 53 गोल केले आहेत.

4. अँटोनी ग्रिजमन- ग्रिजमनला त्याचे आजोबा अमारो लोपेस यांच्याकडून फुटबॉलची प्रेरणा मिळाली. त्याची पार्श्वभूमी आणि इतिहास यामुळे त्याने फुटबॉलमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. अँटोइन हा श्रीमंत कुटुंबातील होता त्यामुळे त्याला फुटबॉलची साधने मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला नाही. त्याचे वडील राजकीयदृष्ट्या शक्तिशाली व्यक्तिमत्त्व होते तर त्यांची आई रुग्णालयात काम करत होती. ग्रीझमनने फुटबॉलपटू म्हणून सराव आणि कठोर परिश्रम करण्यासाठी फ्रेंच सुपरस्टार झिनेदिन झिदान यांच्याकडून प्रेरणा घेतली.

5. कीलियन एम्बाप्पे- एम्बाप्पे हा फिफाच्या इतिहासात गोल करणारा दुसरा सर्वात तरुण फुटबॉलपटू ठरला आहे. त्याला स्नीकर्स गोळा करण्याचा छंद आहे. तो 'बुटिक डी एमबाप्पे' नावाचा स्नीकर्सचा स्वतःचा ब्रँड देखील चालवतो. त्याच्याकडे शेकडो स्नीकर्स आहेत. एम्बाप्पेनेही दोन पांडा दत्तक घेतले आहेत. जे फ्रान्सच्या ब्यूव्हल प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. या बेबी पांडांना प्रथम कॉटन फ्लॉवर आणि लिटल स्नो असे नाव देण्यात आले, जे नंतर बदलून हुआनलिली आणि युआनदुडू करण्यात आले. हा स्टार फुटबॉलपटू अजूनही मुख्यतः पांडांसाठी प्रसिद्धी आणि जागरूकता निर्माण करण्यात गुंतलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT