faf du plessis took stunning catch in rcb vs csk match watch video amd2000 twitter
क्रीडा

Faf Du Plessis Catch: उडता फाफ! डू प्लेसिसने हवेत झेपावत एका हाताने घेतला भन्नाट झेल- Video

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६८ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेला हा सामना प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने शानदार कामगिरी करत २७ धावांनी विजय मिळवला. यासह प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. दरम्यान या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने हवेत ऊडी मारुन शानदार झेल टिपला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

फाफचा भन्नाट झेल

तर झाले असे की, चेन्नई सुपर किंग्ज संघाची फलंदाजी सुरु असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून १५ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता. त्यावेळी मिचेल सँटनर स्ट्राईकवर होता. त्यावेळी षटकातील शेवटचा चेंडू सिराजने फुल टॉस टाकला. या चेंडूवर सँटनरने गॅपमध्ये चौकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. कारण फाफ डू प्लेसिलने हवेत उडी मारत एका हाताने भन्नाट झेल टिपला.त्याच्या या भन्नाट झेलमुळे सँटनर ३ धावा करत माघारी परतला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

फाफची महत्वपूर्ण खेळी

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून विराटने २९ चेंडूंचा सामना करत ४७ धावांची खेळी केली. तर कर्णधार फाफ डू प्लेसिसने३९ चेंडूंचा सामना करत ५४ धावा केल्या. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीसाठी आलेल्या रजत पाटीदारने ४१ धावा केल्या. शेवटी कॅमरुन ग्रीन आणि मॅक्सवेलने आक्रमक खेळी करत संघाला २१८ धावांपर्यंत पोहचवलं.

चेन्नईला हा सामना जिंकण्यासाठी २१९ धावा करायच्या होत्या. मात्र या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चेन्नईला २०१ धावांपर्यंत पोहचायचं होतं. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ १९१ धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटी यश दयालच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने या सामन्यात २७ धावांनी विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT