england cricket team saam tv news
Sports

IND vs ENG Test Series: 'इंग्लंड ही मालिका ५-० ने गमवणार..' दिग्गजाने भविष्यवाणी करत कारणही सांगितलं

Aakash Chopra Statement: भारतीय संघाच्या माजी खेळाडूने भारत- इंग्लंड कसोटी मालिकेबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.

Ankush Dhavre

Aakash Chopra On IND vs ENG Test Series:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

मात्र इंग्लंडला पहिल्या डावात अवघ्या २४६ धावा करता आल्या. या धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत १ गडी बाद ११९ धावा केल्या आहेत. संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल ७६ तर गिल १४ धावांवर नाबाद आहे.

सामन्यातील पहिला दिवस संपल्यानंतर भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने मोठं वक्तव्य केलं आहे. आकाश चोप्राचं म्हणणं आहे की, बॅझबॉलमुळे इंग्लंड ही मालिका ५-० ने गमावणार.

तो म्हणाला की, ' तुम्ही बॅझबॉलबद्दल ऐकलं असेल. मात्र तुम्हाला आता काय दिसतंय? हे बॅझबॉल नाहीतर जैसबॉल आहे. कसोटी क्रिकेट कसं खेळतात हे जयस्वालने दाखवून दिलं आहे. जेव्हापासून इंग्लंडने बॅझबॉल खेळायला सुरुवात केली आहे तेव्हापासून त्यांनी एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. मात्र यावेळी ते पराभूत होणार.' (Cricket News In Marathi)

इंग्लंड ही मालिका ५-० ने गमावणार...

आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, ' या कसोटी मालिकेत इंग्लंडचा ५-० ने पराभव निश्चित आहे. बॅझबॉलमुळे जरी इंग्लंडचा संघ यशस्वी ठरला असेल. मात्र ही साखळी आता तुटणार. भारतीय संघ ही मालिका ५-० ने जिंकणार आहे.'

इंग्लंडच्या फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करताना आक्रमक फलंदाजी केली. मात्र जेव्हा फिरकी गोलंदाज आले तेव्हा त्यांच्या फलंदाजीला कुठेतरी ब्रेक लागला. भारताकडून गोलंदाजी करताना आर अश्विन आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर अक्षर पटेल आणि बुमराहने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

Dal Makhani Recipe: ढाबास्टाईल डाल मखनी खायची इच्छा होते? मग ट्राय करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT