england cricket team  twitter
Sports

England Playing XI: दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात मोठा बदल! २ पाकिस्तानी गोलंदाजांना संघात स्थान

India vs England Playing XI Prediction: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर रंगणार आहे.

Ankush Dhavre

England Playing XI Prediction:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर रंगणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने २८ धावांनी विजय मिळवला होता.

मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज जॅक लीच दुसऱ्या कसोटीतून बाहेर होऊ शकतो. त्यामुळे इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो. (England Playing 11)

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 2nd Test) यांच्यातील दुसरा कसोटी २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टनमच्या डॉ. वायएस राजशेखर क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे दोन्ही संघांच्या प्लेइंग ११ मध्ये ३-३ फिरकी गोलंदाज पाहायला मिळू शकतात.

इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये बदल निश्चित..

दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये १ बदल होणं निश्चित आहे. पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणारा जॅक लीच दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळताना दिसून येणार नाही.

इंग्लंड संघात शोएब बशीर आणि जॅन लॉरेन्स हे २ पर्याय उपलब्ध आहेत. शोएब बशीर हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. तर जॅन लॉरेन्स पार्ट टाईम गोलंदाज असून तो फलंदाजीत मोलाचं योगदान देऊ शकतो. त्यामुळे मुख्य गोलंदाज म्हणून शोएब बशीरचा संघात समावेश केला जाऊ शकतो. (Cricket news in marathi)

या सामन्यासाठी अशी आहे इंग्लंडची प्लेइंग ११:

जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT