ENG vs PAK: बाबर आझमच्या तुफानी खेळीनं इंग्लंड गारद ! Saam Tv
Sports

ENG vs PAK: बाबर आझमच्या तुफानी खेळीनं इंग्लंड गारद !

बाबर आझमच्या तुफानी खेळीनं इंग्लंड गारद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ENG vs PAK T20 नॉटिंगहॅम इंग्लंड England दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान Pakistan क्रिकेट टीमने भलेह वन डे मालिका खेळी नसली, तरी टी २० मालिकेची सुरुवात जोमात केली आहे. पाकिस्तानने टी २० मध्ये आपली सर्वात जास्त धावसंख्या उभारत आहे. इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. पहिल्या टी ट्वेण्टी सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत असताना २० षटकात ६ विकेट गमावून तब्बल २३२ धावांचा डोंगर उभे केले आहे. England by Babar Azam stormy gamedvj97

हे देखील पहा-

या धावसंख्येचा पाठलाग करत असताना इंग्लंडनेही चांगल्या प्रकारे फाईट दिली आहे. मात्र, इंग्लंडला २०१ धावांपर्यंत मजल मारता आली आहे. इंग्लंड कडून लियाम लिविंगस्टोनने तुफानी शतक ठोकले आहे. मात्र, या शतकाला विजयाचा टिळा लागू शकले नाही. पाकिस्तानने पहिल्या टी २० सामन्यामध्ये इंग्लंडचा ३१ धावांनी पराभव करुन, ३ टी २० सामन्यांत १-० अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्याचे नाणेफेक जिंकून, इंग्लंडनी पहिल्यांदाच क्षेत्ररक्षण निवडले आहे. मात्र, त्यांचा हा निर्णय संघाला चांगलंच महागात पडले आहे. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आजम व मोहम्मद रिजवान या दोघांनी स्फोटक सुरुवात केली होती. या दोघांनी १५ षटके पूर्ण होण्याअगोदरच १५० धावांचा टप्पा गाठले आहेत. रिझवानने ४१ चेंडूवर ६३ धावा, तर बाबर आझमने ३ षटकारांसहीत ४९ चेंडूत ८५ धावांची खेळी केली आहे. England by Babar Azam stormy gamedvj97

यामुळे मधल्या फळीत मकसूद १९, हाफिज २५ आणि फखर जमाने २४ धावा काढले आहेत. यामुळे पाकिस्तानला २० षटकामध्ये ६ बाद २३२ अशी सर्वात मोठी धावसंख्या उभा करता आली आहे. याअगोदर पाकिस्तानने २०५ ही टी- २० मधील सर्वोच्च धावसंख्या मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिके विरुद्ध केले होते.

दरम्यान, पाकिस्तानच्या २३३ धावांचे लक्ष घेऊन, मैदानामध्ये उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात मात्र खराब झाली आहे. इंग्लंडने आपल्या पहिल्या ४ विकेट १०० धावांच्या आत मधेच गमावले आहे. मात्र, मधल्या फळीत लियाम लिविंगस्टोनने चांगलीच खेळी केली आहे. त्याची खेळी बघता इंग्लंड हा सामना जिंकणार अशी एक वेळ आली होती. २७ वर्षीय या खेळाडूने ४३ चेंडूमध्ये १०३ धावांची धुवाँधार खेळी केली आहे. England by Babar Azam stormy gamedvj97

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

Maharashtra Rain Live News: ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांनाही सुट्टी

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT