Duleep Trophy 2024 
क्रीडा

भारतीय अ संघाने जिंकली Duleep Trophy 2024! भारतीय क संघावर मिळवला 132 धावांनी विजय

Duleep Trophy : भारतीय क्रिकेटच्या अ संघाने दुलिप ट्रॉफी जिंकलीय. भारतीय अ संघाने भारतीय क संघाला १३२ धावांनी पराभूत करत दुलीप ट्रॉफी जिंकलीय.

Bharat Jadhav

भारतीय संघाने आज चेन्नईच्या मैदानावर बांगलादेशला धूळ चारली. तर दुसरीकडे मयांक अगरवालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय अ संघाने भारतीय क संघाला १३२ धावांनी पराभूत करत दुलीप ट्रॉफी २०२४ वर नाव कोरलं आहे. या सामन्यात भारतीय क संघाकडून साई सुदर्शनने शतकी खेळी केली. मात्र ही खेळी संघाच्या विजयासाठी पुरेशी ठरली नाही.

गायकवाडला पहिल्या डावात विशेष काही करता आले नाही. मात्र दुसऱ्या डावात ४४ धावा केल्या. भारतासाठी शाश्वत रावतने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. भारत अ संघाने पहिल्या डावात २९७ धावा केल्या. यादरम्यान शाश्वतने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने २५० चेंडूंचा सामना करत १२४ धावा केल्या. शाश्वतच्या या खेळीत १५ चौकारांचा समावेश होता. आवेश खानने नाबाद राहत अर्धशतक झळकावले. त्याने ६८ चेंडूत ५१ धावा केल्या. यानंतर भारतीय अ संघाने ८६ धावांवर दुसरा डाव घोषीत केला.

सुदर्शनचं शतक

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया क संघाने पहिल्या डावात २३४ धावा केल्या. यादरम्यान अभिषेक पोरेलने ८२ धावांची खेळी केली. त्याने ९ चौकार मारले. रजत पाटीदार शून्यावर बाद झाला. साई सुदर्शन १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. क संघ दुसऱ्या डावात २१७ धावा करून सर्वबाद झाला. कर्णधार गायकवाडने ४४ धावांचे योगदान दिले. तर सुदर्शनने शतक झळकावले. त्याने २०६ चेंडूत १११ धावा केल्या. तरी तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

SCROLL FOR NEXT