pat cummins  saam tv
Sports

WTC Final: 'आमच्यामुळे टीम इंडिया फायनलमध्ये पोहचली..' ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या वक्तव्याने खळबळ

Pat Cummins On WTC Final: या महत्वाच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे.

Ankush Dhavre

IND vs AUS WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना येत्या ७ ते ११ जून दरम्यान लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे.

अतिशय महत्वाचा सामना असल्याने दोन्ही संघांतील खेळाडू जोरदार मेहनत घेताना दिसून येत आहेत. भारतीय संघाला दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याची संधी मिळाली आहे.

दरम्यान या महत्वाच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे. (Pat Cummins On WTC Final)

आम्ही भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवलं..

अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने म्हटले आहे की, 'आम्ही भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचवलं आहे. मात्र लोकं हे विसरून गेले आहेत.

' द सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार पॅट कमिन्सने म्हटले की, ' २०२१ मध्ये स्लो ओव्हर रेटमुळे आमचे पॉईंट्स कमी झाले होते. त्यामुळे आम्ही अंतिम फेरीत पोहचू शकलो नव्हतो. न्यूझीलंडने इंग्लंडमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दमदार कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या बळावर त्यांनी भारतीय संघाला पराभूत केलं होतं.'

भारतीय संघाबद्दल केलं मोठं वक्तव्य..

तसेच तो भारतीय संघाबद्दल बोलताना म्हणाला की, ' आम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहोत. आम्हाला भारतीय संघाकडून बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. जेव्हा कुठल्याही संघाविरुद्ध इतकी मोठी मालिका असते, त्यावेळी आव्हान मोठं असतं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघरोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, अॅलेक्स कॅऱी (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेज़लवुड, ट्रेविस हेड, जॉश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख़्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, टॉड मर्फ़ी, स्टीवन स्मिथ (उपकर्णधार) मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

राखीव खेळाडू: मिचेल मार्श, मॅट रेनशॉ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT