IND VS AUS saam tv
Sports

IND VS AUS: 'सूर्या'चे होणार पदार्पण तर 'या' २ खेळाडूंचा होणार पत्ता कट,पाहा कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्याला ९ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे. नागपूरच्या मैदानावर पार पडणाऱ्या या सामनात भारतीय संघाची प्लेइंग ११ कशी असेल याबाबत अनेक दिग्गज खेळाडूंनी आपली मतं मांडली आहेत.

Saam TV News

IND VS AUS-भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्याला ९ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे. नागपूरच्या मैदानावर पार पडणाऱ्या या सामनात भारतीय संघाची प्लेइंग ११ कशी असेल याबाबत अनेक दिग्गज खेळाडूंनी आपली मतं मांडली आहेत. नुकताच दिनेश कार्तिकने देखील प्लेइंग ११ बाबत वक्तव्य केले आहे.

कार्तिकने आपल्या प्लेइंग ११ मधून शुभमन गिलला बाहेर ठेवले आहे. शुभमन गिल गेल्या काही सामन्यांपासून जोरदार फॉर्ममध्ये आहे. तरीदेखील दिनेश कार्तिकने त्याला संघाबाहेर ठेवले आहे. तर सलामीला फलंदाजी करण्यासाठी त्याने रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची निवड केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याने चेतेश्वर पुजाराची निवड केली आहे.(Team India)

तर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी येईल. त्याला साथ देण्यासाठी पाचव्या क्रमांकावर दिनेश कार्तिकने सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. तर रिषभ पंतच्या अनुपस्थितीत केएस भरतला यष्टिरक्षणाची जाबाबदारी दिली जाऊ शकते.(Latest Sports Update)

तसेच फिरकी गोलंदाज म्हणून आर अश्विनला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले आहे. अश्विन हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे.

त्याला साथ देण्यासाठी रवींद्र जडेजा देखील या मालिकेत पुनरागमन करणार आहे. गेल्या ६ महिन्यांपासून रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.त्याला आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून देखील बाहेर राहावे लागले होते. तो देखील या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. तर मोहमद सिराज आणि मोहम्मद शमी हे दोघेही वेगवान गोलंदाजी आक्रमणाची धुरा सांभाळताना दिसून येऊ शकतात.

दिनेश कार्तिकने सुचवलेली प्लेइंग ११: केएल राहुल. रोहित शर्मा (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT