Dewald Brevis  Saam Tv
Sports

Dewald Brevis Batting Practice: ज्युनिअर मिस्टर 360 ची वानखेडेवर 'नो लूक 'फटकेबाजी! शेवटचा चेंडू तर थेट मैदानाबाहेर - VIDEO

IPL 2023 - Dewald Brevis Batting Video: ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंबईचा हुकुमचा एक्का डेवाल्ड ब्रेविस तुफान फटकेबाजी करताना दिसून आला आहे.

Ankush Dhavre

Mumbai Indians Practice Session: आयपीएल स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे.

ही स्पर्धा सुरू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. स्पर्धेतील पहिला सामना गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंबईचा हुकुमचा एक्का डेवाल्ड ब्रेविस तुफान फटकेबाजी करताना दिसून आला आहे.

आगामी आयपीएल स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सराव करायला सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सने देखील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी आपली सराव मोहीम सुरू केली आहे. दरम्यान संघातील बिग हिटर डेवाल्ड ब्रेविस जोरदार सराव करताना दिसून आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डेवाल्ड ब्रेविस नेट्समध्ये फलंदाजी करण्यासाठी येतो. त्यावेळी तो तुफान फटकेबाजी करताना दिसतो. मात्र एकूण एक शॉट तो नो लूक शॉट खेळतो. त्याची ही आक्रमक फलंदाजी पाहून, हा फलंदाज नक्कीच विरोधी संघातील गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतात. (Latest Sports updates)

मुंबई इंडियन्स स्क्वाड:

रोहित शर्मा, कॅमरन ग्रीन, राघव गोयल, विष्णू विनोद, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, पियुष चावला, ड्वेन जॉन्सन, शम्स मुलानी, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शद खान, कुमार कार्तिकेय,हृतिक शोकीन, बेहरेनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस,जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Tourism : नाशिकला गेलाय? मग 'हा' ऐतिहासिक किल्ला नक्की पाहा

Vashi Fire : दिवाळीत संसाराची राखरांगोळी, वाशीतील आगीत ४ जणांचा मृत्यू

Amruta Khanvilkar : "दिवाळीचा फटाका"; 'चंद्रा'ला पाहून चाहते झाले सैराट

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची उघडीप, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT