RCB vs DC WPL 2023 :
RCB vs DC WPL 2023 : Saam tv
क्रीडा | IPL

RCB vs DC WPL 2023 : रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा मोठा विजय; ६ गडी राखून केला रॉयल चॅलेंजर्सचा पराभव

Vishal Gangurde

RCB vs DC WPL 2023 News : वुमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांत रोमांचक सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स संघाने दिल्ली कॅपिटल्सला संघाला १५१ धावांचे आव्हान दिले होते. १५१ धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरेलल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ गडी राखून रॉयल चॅलेंजर्सचा पराभव केला. (Latest Marathi News)

रॉयल चॅलेंजर्स संघाने दिलेल्या धावांचे पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात निराशजनक झाली. शेफाली शर्मा शून्य धावावर बाद झाली. शेफालीला मेगन शूटने त्रिफळाचित केले. त्यानंतर मॅग लैनिंग आणि कॅप्सीने दुसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागिदारी रचली. कॅप्सीला पाचव्या षटकात प्रिती पोसने बाद केले. लैनिंगला नवव्या षटकात आशाने बाद केले. (Latest Cricket News)

जेमिमाह आणि मारिजॅनने चौथ्या विकेटसाठी ३९ धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोड्रिग्सला १५ व्या षटकात आशाने बाद केले. तर जेस आणि कॅप्सने ४५ धावांची भागिदारी रचत दिल्ली (Delhi) कॅपिटल्सला जिंकवलं.

दिल्ली कॅपिटल्स संघाला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी ९ धावा हव्या होत्या. मानधनाने शेवटच्या षटकाची जबाबदारी रेणुका ठाकूर सिंहला देली. मात्र, रेणुका शेवटच्या षटकात फार काही कमाल दाखवू शकली नाही. जोनासनने तिच्या खेळीत चार चौकार आणि १ षटकार लगावला. तर कॅप्सने ३ चौकार आणि षटकार लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मोठी बातमी! जालन्यात मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवे यांना घेरलं

Summer Health: घामोळ्या, पुरळसारख्या समस्यांवर रामबाण उपाय; त्वाचेच्या सर्व समस्या होतील गायब

Kshitij Zarapkar : अभिनेते क्षितीज झारापकर यांचं कर्करोगाने निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

ICC Champions Trophy: 'टीम इंडियाला पाकिस्तानात यावंच लागेल, अन्यथा...' माजी पाकिस्तानी खेळाडूची वॉर्निंग

Kalyan Crime News: तहान लागल्याने पाणी प्यायला गेली, नराधमानं संधी साधली; कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT