DC vs RR Head to head record delhi capitals vs rajasthan royals record news in marathi amd2000 twitter
Sports

DC vs RR, IPL 2024: मुंबईने दिलेल्या संधीचं दिल्ली सोनं करणार का? वाचा राजस्थानविरुद्ध कसा राहिलाय रेकॉर्ड

DC vs RR, Head To Head Record: आज होणाऱ्या सामन्यात दिल्लीचा संघ आपल्या होम ग्राऊंडवर राजस्थान रॉयल्सचा सामना करताना दिसून येणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५६ व्या सामन्यात दिल्लीचा संघ राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना जिंकून राजस्थान रॉयल्सला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाला प्लेऑफच्या शर्यतीत टीकून राहण्यासाठी हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे.

राजस्थान रॉयल्स संघाने जवळजवळ प्लेऑफमध्ये गाठलं आहे. मात्र अव्वल स्थानी जाण्याासाठी राजस्थानचा संघ जोर लावताना दिसून येईल. तर दुसरीकडे दिल्लीला सर्व सामने जिंकणं गरजेचं आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत ११ पैकी ५ सामने जिंकले आहेत. हा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाबद्दल बोलायचं झालं, तर राजस्थानने ८ सामने जिंकले असून हा संघ १६ गुणासंह अव्वल स्थानी आहे.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर हे दोन्ही संघ २८ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान राजस्थान रॉयल्सने १५ सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स संघाला १३ सामने जिंकता आले आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना २०७ धावा ही दिल्लीची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर २२२ धावा ही राजस्थान रॉयल्स संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे.

अरुण जेटली स्टेडियमवर खेळताना असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड...

एकूण सामने - ८

दिल्ली कॅपिटल्स- ५

राजस्थान रॉयल्स- ३

खेळपट्टी कोणाला देणार साथ?

अरुण जेटली स्टेडियमची बाऊंड्रीलाईन छोटी आहे. त्यामुळे या मैदानावर धावांचा पाऊस पाहायला मिळतो. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ५०० पेक्षा अधिक धावा कुटल्या होत्या. त्यामुळे या सामन्यातही मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते.

कसं असेल हवामान?

Accuweather.com च्या अंदाजानुसार, दिल्लीतील तापमान ३३ डिग्रीच्या आसपास असेल. तर सामन्यावेळी पाऊस पडणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: घर, संसार सांभाळत पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवलं, MPSC परीक्षेत सुरैया देसाई महिलांमध्ये राज्यात आल्या पहिल्या

Appam Recipe: नाश्त्यासाठी घरच्या घरी झटपट बवनी स्पंजी आणि चविष्ट अप्पम, वाचा सोपी रेसिपी

King Of Forts : सह्याद्रीच्या कडेकपारीतून शिवरायांनी घडवलाय इतिहास, 'गडांचा राजा' तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातविरोधात चौदावा गुन्हा, 16 एकर जागा केली हडप

Dhurandhar 2 OTT : आता थिएटरमध्ये नाही तर घरबसल्या बघा 'धुरंधर २', ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार?

SCROLL FOR NEXT