Table Tennis CWG 2022 news
Table Tennis CWG 2022 news  saam tv
क्रीडा | IPL

Table Tennis CWG 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा डंका; अचंता शरत कमल, सात्विक और चिरागने जिंकले सुवर्णपदक

Vishal Gangurde

Table Tennis CWG 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेत आज देशाच्या क्रीडा क्षेत्रात (sports) उत्साहाचे वातावरण आहे. कालपासून भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकण्याचा धडाकाच लावला आहे. आज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सुवर्णपदक जिंकल्यानंतर टेबल टेनिसमध्ये पुरुषांच्या एकेरी गटात अंतिम सामना जिंकून भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरत कमलने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. तर पुरुषांच्या दुहेरी गटात सात्विक साईराज रंकीरेड्डी और चिराग शेट्टी यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकलं आहे.

अचंताने अंतिम सामन्यात इंग्लंडचा टेबल टेनिसपटू लियाम पिचफोर्डचा पराभव केला आहे. अंचताने सामन्यात ११-१३, ११-७, ११-२, ११-७ असा खेळ दाखवत सुवर्णपदक जिंकलं आहे. अंचताने मागच्या वेळी गोल्ड कोस्टमध्ये खेळलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटात कांस्यपदक जिंकलं होतं. ४० वर्षांच्या या अनुभवी टेबल टेनिसपटूला अनेकांनी पदकाचा रंग बदलण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे.

अचंताने उपांत्य फेरीत इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉलचा पराभव करून अंतिम सामन्यात आपलं स्थान पक्क केलं. पिचफोर्डला अंतिम सामन्यात अचंताचा पराभव करू अशी आशा होती. परंतु भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता कमलने चमकदार खेळ दाखवत सुवर्णपदक खिशात घातले. अंचताने सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीयांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, पुरुष दुहेरीत साईराज रंकीरेड्डी और चिराग शेट्टी या भारतीय जोडीने खेळाचे दमदार प्रदर्शन दाखवत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. बर्मिंघम येथे सुरू असलेल्या अंतिम सामन्यात सात्विक आणि चिरागने इंग्लंडमध्ये बेन लेन आणि सीन वेंडी या दोघांचा पराभव केला आहे. सात्विक आणि चिरागने २१-१५, २१-१३ असा खेळ दाखवत सामना खिशात घातला आहे. हे दोघे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकणारे पहिले खेळाडू ठरले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: राज्यात आजही पावसाचा इशारा, तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस, वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya : या राशींच्या मनासारख्या घटना घडतील, प्रलंबित कामे होतील पूर्ण; वाचा संपूर्ण राशिभविष्य

Horoscope Today : 'या' राशीच्या लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार

Maharashtra Election: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतदानाची का होतेय चर्चा?

Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत

SCROLL FOR NEXT