Chennai Super Kings Vs Mumbai Indians Match Updates Twitter
Sports

CSK Vs MI, IPL 2023: धोनीच्या बालेकिल्ल्यात मुंबईची दाणादाण; चेन्नईला विजयासाठी १४० धावांचं लक्ष

Chennai Super Kings Vs Mumbai Indians Match Updates: चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सला १३९ धावांवर रोखलं आहे. मुंबईकडून नेहाल वडेरा आणि सूर्यकुमार यादव वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

Satish Daud

 Chennai Super Kings Vs Mumbai Indians Match Updates: फिरकीपटू महेश तीक्ष्णाचा भेदक मारा, त्याला तुषार देशपांडेने दिलेली चांगली साथ आणि डेथ ओव्हरमध्ये महेश पथिरानाने केलेल्या जबदस्त गोलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सला १३९ धावांवर रोखलं आहे. मुंबईकडून नेहाल वडेरा आणि सूर्यकुमार यादव वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. (Latest sports updates)

महेंद्रसिंग धोनीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नईच्या चेपॉक मैदानावर चेन्नईने टॉस जिंकून  मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजासाठी आमंत्रित केलं. दुसऱ्याच षटकात मराठमोळ्या तुषार देशपांडेने मुंबईला मोठा धक्का दिला. त्याने सर्वात महागडा खेळाडून कॅमरुन ग्रीनच्या दांड्या उडवल्या. ग्रीन अवघ्या ६ धावा काढून बाद झाला.

त्यानंतर दीपक चहरने आधी इशान किशन आणि त्यानंतर इंपॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात आलेल्या कर्णधार रोहित शर्माला बाद करत मुंबईला बॅकफूटवर ढकललं. इशान किशनने ७ धावा केल्या. तर रोहितला भोपळाही फोडता आला नाही.

आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण २६ धावांवर सूर्यकुमार यादव बाद झाला. जाडेजाने सूर्याला तंबूत पाठवले. सूर्या बाद झाल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या.

एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला नेहाल वढेरा याने दमदार फलंदाजी केली. नेहाल वढेरा याने अर्धशतकी खेळी केली. वढेरा याने ५१ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. यामध्ये १ षटकार आणि ८ चौकार लगावले.

नेहाल वढेराचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला तीस धावसंख्या गाठता आली नाही. टिम डेविड दोन धावांवर तंबूत परतला. अर्शद खान एका धाव काढून बाद झाला. ट्रिस्टन स्टब्स याने २१ चेंडूत २० धावा केल्या. मुंबईकडून फक्त एकमेव षटकार मारता आला. चेन्नईच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच भेदक मारा केला.

मुंबईच्या फलंदाजांना ठरावीक अंतराने बाद करत मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. मुंबईच्या फलंदाजांना एकही मोठी भागिदारी करु दिली नाही. त्यामुळे मुंबईला निर्धारित २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्या १३९ धावाच करता आल्या. चेन्नईकडून पथीराणा याने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर दीपक चहर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. याशिवाय रविंद्र जाडेजाने एका फलंदाजाला माघारी पाठवलं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT