csk vs kkr saam tv
Sports

CSK VS KKR Match Result: नाद करा पण रिंकू-राणाचा कुठं! घरच्याच मैदानावर CSK चा दारुण पराभव,प्ले ऑफचे गणितच बदलले

CSK VS KKR Match Highlights: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

Ankush Dhavre

CSK VS KKR IPL 2023 : आयपीएल २०२३ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार पार पडला. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जोरदार कामगिरी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर एकतर्फी विजय मिळवला.

तर दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने चेन्नई एक्सप्रेसला ब्रेक लावत जोरदार विजय मिळवला आहे.

चेन्नईने केल्या १४४ धावा..

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून शिवम दुबेने तुफान फटकेबाजी केली.

इंपॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला येत त्याने ३ षटकार आणि १ चौकाराच्या साहाय्याने ४८ धावांची खेळी केली. डेव्होन कॉनव्हेने ३० धावांचे योगदान दिले. सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाडला या डावात मोठी खेळी करता आली नाही.

तो अवघ्या १७ धावा करत माघारी परतला. चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद १४४ धावा केल्या.

कोलकाताचा शानदार विजय...

कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १४५ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीर फलंदाजांना हवी तशी फलंदाजी करता आली नाही. जेसन रॉय १२ तर गुरबाज १ धाव करत माघारी परतला. शेवटी कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू सिंगने नाबाद अर्धशतकी खेळी करत कोलकाता नाईट रायडर्स संघाला जोरदार विजय मिळवून दिला. (Latest sports updates)

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, महीश थिक्षाना

कोलकाता नाईट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), जेसन रॉय, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक, गोकुळ'च्या निवडणुकीत अंधश्रद्धेचा बाजार

SCROLL FOR NEXT