CSK VS DC x
Sports

CSK VS DC Highlights : धोनी ब्रिगेडला एकटा केएल राहुल भिडला; दिल्लीचं चेन्नईसमोर तगडं आव्हान

CSK VS DC Match Highlights : चेपॉक स्टेडियममध्ये चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यात टॉस जिंकत दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने २० ओव्हर्समध्ये १८३ धावा केल्या.

Yash Shirke

CSK VS DC IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या आजच्या सामन्यामध्ये दिल्लीने टॉस जिंकून पहिली फलंदाजी केली. दिल्लीच्या संघाने २० ओव्हर्समध्ये १८३ धावा केल्या. या सामन्यामध्ये लखनऊकडून फलंदाजी करताना केएल राहुलने सर्वात जास्त धावा केल्या. तर चेन्नईच्या बाजूने खलील अहमदने सर्वाधिक २ गडी बाद केले.

चेपॉक स्टेडियममध्ये आयपीएल २०२५ मधील चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याला सुरुवात झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना चेन्नईच्या घरच्या स्टेडियममध्ये खेळत असल्याने सीएसकेचे पारडे जड असल्याचे म्हटले जात होते.

दिल्लीचा सलामीवीर जॅक फ्रेझर मॅकगर्क शून्यावर बाद झाला. त्यानंतर अभिषेक पोरेल मैदानात उतरला. दुसऱ्या बाजूने केएल राहुल खेळ सावरत होता. अभिषेक ३३ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर अक्षर पटेलने २१ आणि समीर रिझवीने २० धावा केल्या. केएल राहुलने सर्वाधिक ७७ धावा केल्या. चेन्नईकडून खलील अहमदने सर्वाधिक २ विकेट्स काढल्या. तर रवींद्र जडेजा,नूर अहमद आणि मथीशा पाथिरानाने प्रत्येकी १-१-१ विकेट घेतल्या.

चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, आर. अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथीशा पाथिराना.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

अक्षर पटेल (कर्णधार), जॅक फ्रेझर मॅकगर्क, केएल राहुल, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT