CSK injury news saam tv
Sports

IPL 2026: CSK ला दुखापतींचं ग्रहण, धोनीपाठोपाठ हा खेळाडूही टीममधून बाहेर

IPL 2026 CSK team news: आयपीएल 2026 च्या सुरुवातीलाच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. डेवाल्ड ब्रेविस दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडला असून एमएस धोनीही सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल 2026 च्या सुरुवातीलाच चेन्नई सुपर किंग्सला एकामागून एक धक्के बसताना दिसतायत. आज चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना रंगणार आहे. मात्र त्यापूर्वीच टीमला एक मोठा धक्का बसलाय. महेंद्र सिंग धोनीनंतर अजून एक खेळाडू पहिल्या सामन्यातून बाहेर झाला आहे.

डेवाल्ड ब्रेविस दुखापतीमुळे बाहेर

चेन्नई सुपर किंग्सचा आक्रमक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस साइड स्ट्रेनमुळे 30 मार्च रोजी गुवाहाटीमध्ये होणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सामन्यापूर्वी ही माहिती दिली होती. ब्रेविस पुढील दोन ते तीन सामने खेळू शकार नाही. त्यामुळे टीमच्या मिडल ऑर्डरमुळे काही बदल होण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आयपीएल 2025 मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता. चेन्नईने त्याला 2.20 कोटी रुपयांत रिटेन केलं होतं. गेल्या सिझनमध्ये त्याने सहा सामन्यांत 37.50 च्या सरासरीने आणि तब्बल 180 च्या स्ट्राइक रेटने 225 रन्स केले होते. यामध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश होता.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सची अचडण आधीपासून वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. टीमचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस दुखापतीमुळे संपूर्ण सिझनमधून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर अनुभवी विकेटकीपर फलंदाज एमएस धोनीलाही काफ स्ट्रेनमुळे आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांत खेळू शकणार नाहीये.

वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी

ब्रेविसने नुकत्याच झालेल्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्याने आठ सामन्यांत 146.80 च्या स्ट्राइक रेटने 207 रन्स केले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

गेल्या आयपीएल सिझनमध्ये केवळ चार विजयांसह शेवटच्या स्थानावर राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडून यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पण सिझनच्या सुरुवातीलाच झालेल्या सलग दुखापतींमुळे टीमच्या अडचणी वाढल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT