shreyas gopal twitter
Sports

SMAT 2024, Shreyas Gopal: W,W,W,W,W...चेन्नईने ३० लाखात घेतलेला बॉलर चमकला! IPL गाजवणार

Shreyas Gopal: चेन्नईने ३० लाखात घेतलेल्या गोलंदाजाने सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत चांगलीच हवा केली आहे.

Ankush Dhavre

Syed Mushtaq Ali Trophy, Shreyas Iyer: चेन्नई सुपर किंग्ज हा असा संघ आहे, ज्या संघाने युवा गोलंदाजांना संघात संधी देऊन त्यांना स्टार बनवलं आहे. यासह अनुभवी गोलंदाजांना संघात घेऊन त्यांनी त्यांच्या अनुभवाचा चांगलाच फायदा करुन घेतला.

काही दिवसांपूर्वी आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात त्यांनी ३० लाख मोजत श्रेयस गोपलला संघात स्थान दिलं. ज्या गोलंदाजाला कुठल्याही संघाने स्थान दिलं नाही, त्या गोलंदाजाला चेन्नईने आपल्या संघात स्थान दिलं. आता याच गोलंदाजाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दमदार कामगिरी करुन दाखवली आहे.

आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने ३० लाख मोजत श्रेयस गोपालला खरेदी केलं. आता तो चेन्नईने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना दिसून येत आहे. कर्नाटकडून खेळताना त्याने सिक्कीमविरुद्ध झालेल्या सामन्यात दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

त्याने या सामन्यात गोलंदाजी करताना ४ षटकात १३ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. त्याने २४ पैकी १३ चेंडू निर्धाव टाकले. या शानदार गोलंदाजीच्या बळावर सिक्कीमचा डाव अवघ्या ८२ धावांवर आटोपला. त्याला साथ देत विद्याधर पाटीलने ३ षटकात १० धावा खर्च करत ३ गडी बाद केले.

चेपॉकवर श्रेयसला संधी मिळणार?

श्रेयस गोपाळ आगामी हंगामात चेन्नईकडून खेळताना दिसून येणार आहे.या संघात आर अश्विन आणि रविंद्र जडेजासारखे अनुभवी गोलंदाज आहेत. त्यामुळे श्रेयसला संधी मिळणं जरा कठीण आहे. मात्र त्याला जर संधी मिळाली, तर चेन्नईसाठी हुकमी एक्का ठरु शकतो.

श्रेयस गोपाळचा आयपीएल स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला, तर त्याने आतापर्यंत ५२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५२ गडी बाद केले आहेत. कर्नाटकला हा सामना जिंकण्यासाठी फार धावा करायच्या नव्हत्या. या धावांचा पाठलाग करताना कर्नाटकने ५.४ षटकात ८६ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT