virat kohli  saam tv
Sports

Virat Kohli's First Car: डिझेल कार घेतली अन् भरलं पेट्रोल;वाचा विराटच्या पहिल्या कारचा भन्नाट किस्सा

Virat Kohli: विराट कोहलीने देखील जेव्हा आपली पहिली कार घेतली होती, त्यावेळी विराटसोबत एक भन्नाट किस्सा घडला होता.

Ankush Dhavre

Virat Kohli Funny Incident: स्व कमाईतून कार घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. कार खरेदी करताना बराच वेळ रिसर्च केला जातो. अनेकांचा सल्ला देखील घेतला जातो. कारण पहिली कार ही नेहमीच खास असते.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने देखील जेव्हा आपली पहिली कार घेतली होती, त्यावेळी विराटसोबत एक भन्नाट किस्सा घडला होता.

विराट कोहलीने त्याच्या पहिल्या कार खरेदीचा किस्सा एका मुलाखतीत बोलताना सांगितला आहे. हा किस्सा सांगताना विराट म्हणाला की, 'मी माझ्या स्वतःच्या पैशाने सफारी गाडी खरेदी केली होती. त्यावेळी या गाडीची प्रचंड क्रेझ होती. सफारी गाडी दिसताच रस्त्याने चालणारे लोकं बाजुला व्हायचे. या गाडीचा क्रेझ पाहुन मला कार खरेदी करण्याची प्रेरणा मिळाली.

तसेच कार खरेदी केल्यानंतरचा किस्सा सांगताना विराट कोहली म्हणाला की,'गाडी खरेदी केल्यानंतर मी माझ्या भावासोबत गाडीमध्ये Fuel भरण्यासाठी गेलो होतो. मोठ्या थाटात गाडीत पेट्रोल भरलं. पेट्रोलची टाकी फूल केली आणि तिथून निघालो. काही अंतर पार करताच गाडी झटके देऊ लागली, तेव्हा आमच्या लक्षात आलं की मोठ्या उत्साहात डिझेलच्या गाडीत आम्ही पेट्रोल भरलं आहे.' हा किस्सा सांगताना विराट पोट धरून हसला. (Latest sports updates)

विराट कोहली कार कलेक्शन..

विराट कोहलीकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्या आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये बेंटले कॉन्टिनेंटल जीटी लग्जरी कार आहे. ज्याची किंमत ४.०४ कोटी रुपये इतकी आहे. तर बेंटलेची फ्लाइंग स्पर लग्जरी कार देखील आहे.

ज्याची किंमत ३.४१ कोटी रुपये इतकी आहे. तसेच ऑडी आर ८ एलएमएक्स लिमिटेड एडिशन कार देखील आहे. या कारची किंमत २.९७ कोटी रुपये इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

Maharashtra News Live Update: वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT